मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /साडीतल्या या सुंदर नारीला नाजूक समजू नका; तिचा हा VIDEO पाहून भल्याभल्यांना फुटला घाम

साडीतल्या या सुंदर नारीला नाजूक समजू नका; तिचा हा VIDEO पाहून भल्याभल्यांना फुटला घाम

महिलेनं साडीवर असं काही करून दाखवलं ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल.

महिलेनं साडीवर असं काही करून दाखवलं ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल.

महिलेनं साडीवर असं काही करून दाखवलं ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल.

मुंबई, 07 जून : साडी (Saree) नेसून बहुतेक तरुणींना साधं उठता, बसताही येत नाही. चालतानाही त्या अडखळतात. पण काही महिला मात्र याच साडीत असं काही करतब करताना दिसतात की पाहूनच घाम फुटेल. साडीतील महिला म्हटली की सुंदर, नाजूक अशीच वाटते. पण याच साडीत महिला काय काय करू शकते, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Woman excercise video viral) होतो आहे. ज्यामध्ये त्या महिलेनं साडी नेसून चक्क सिलेंडर उचलून वर्कआऊट (Woman excercise with cylinder wearing saree) केलं आहे.

लाल साडी नेसून सिलेंडरसोबत वर्कआऊट करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओत पाहू शकता महिलेनं लाल रंगाची साडी नेसली आहे. ती दिसायलाही खूपच सुंदर आहे. तिच्या हातात एक सिलेंडर दिसतो आहे. आता ही सुंदर, नाजूक महिला या सिलेंडरसोबत नेमकं काय करणार असा प्रश्न आपल्याला पडतो न पडतो तोच ही महिला तो सिलेंडर आपल्या दोन्ही हातात पकडते आणि उचलते.

सिलेंडर घेऊन ती वर्कआऊट करताना दिसते. बरं तिचा हा सिलेंडरसोबत एक्सरसाइझ करताना फक्त एकच व्हिडीओ नाही तर असे बरेच व्हिडीओ आहे.

हे वाचा - इवल्याशा हातांनी भरभर कापतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून हैराण व्हाल

घरच्या घरी जुगाड करून ही महिला वर्कआऊट करते. सामान्यपणे जीममध्ये किंवा घरी एक्सरसाइझ करण्यासाठी काही मशीन्स असतात. पण ही महिला अशा कोणत्याही मशीन्सचा वापर करत नाही. अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानातून विशेषतः सिलेंडरचा वापर करूनच ती एक्सरसाइझ करताना दिसते.  याआधी छातीवर, पोटावर, पाठीवरही असे सिलेंडर घेऊन ती एक्सरसाइझ करताना दिसली.

हे वाचा - Unlock ची आनंद महिंद्रांनीही घेतली फिरकी; ट्वीट केला मजेशीर VIDEO

या महिलेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे बरेच व्हिडीओ आहेत. शैली चिकारा असं तिचं नाव आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील प्रोफाइलनुसार ती एक सर्टिफाइड फिटनेस कन्सलटंट आहे. तिला वंडर वुमन तसंच लेडी बाहुबली म्हणूनही म्हटलं जातं.

First published:

Tags: Fitness, Shocking viral video, Viral, Viral videos