मुंबई, 16 डिसेंबर : हिवाळ्यात अनेकदा असे पदार्थ बनवले जातात जे तुमच्या शरीराला उबदार ठेवतात. तसेच या हंगामात भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ले जातात. जेवणातील भाज्या असो किंवा डाळी यांत तुम्ही वेगवेगळे मसाले वापरून त्यांची चव बदलू शकता. परंतु भाकरीसोबत असे क्वचितच घडते. बहुतांश लोक गव्हाच्या पिठाची चपाती खातात. परंतु तुम्ही गव्हाच्या चपातीऐवजी हिवाळ्यात कधीकधी बाजरीची भाकरी देखील खाऊ शकता. बाजरीची भाकरी चवीला अतिशय स्वादिष्ट असते. तसेच त्यात अनेक पोषक घटकही असतात. बाजरीमध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्नसारखे शरीराला आवश्यक असलेले घटक असतात. बाजरीची भाकरी खाल्ल्याने पचनक्रिया देखील चांगरी राहते. तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. बाजरी हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर हा रामबाण उपाय आहे. यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बाजरीची भाकरी आणि त्याच्या पिठामुळे हिवाळ्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.
Water Chestnut Benefits : हिवाळ्यात नक्की खा शिंगाडा, वजनासोबत ब्लड प्रेशरही राहील नियंत्रितबाजरीची भाकरी खाण्याचे फायदे - झी मीडियाच्या रिपोर्टनुसार सुमारे 100 ग्रॅम बाजरीमध्ये 11.6 ग्रॅम प्रथिने आणि 67.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. बाजरीत पोटॅशियम, अमीनो अॅसिड, कॅल्शियम, झिंक, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वां अनेक पोषक घटक असतात.
- नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते. बाजरी गॅस, पोटदुखी आणि अपचन यासह अनेक समस्या दूर करते. यामध्ये असलेले आयर्न शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत करते. तसेच या भाकरीमुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका देखील कमी होतो. तसेच ही भाकरी गर्भवती महिलांना अॅनिमियाच्या धोक्यापासून दूर ठेवते. - तज्ञांनुसार गव्हाच्या तुलनेत बाजरीमध्ये 3 ते 5 पट अधिक पोषक तत्वे आढळतात. बाजरी असलेल्या कॅल्शियममुळे हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि हाडे मजबूत होतात. तसेच यातील व्हिटॅमिन B-3 शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. Dink Ladoo Recipe : अशा पद्धतीने बनवा डिंकाचे लाडू; थंडीत ऊर्जाही मिळेल आणि पचनशक्तीही होईल मजबूत (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)