नवी दिल्ली, 2 जुलै: मुलींच्या कपड्यांची फॅशन (Fashion) काही काळाने बदलत असते. पण, फॅशनचा एक प्रकार मुलींमध्ये जास्त पॉप्युलर (Popular Trend) आहे. आजकाल मुलीही मुलांप्रमाणेच जीन्स,टी-शर्ट,शर्ट आणि पॅन्ट घालतात. जीन्स आणि शर्ट (Jeans & Shirt) हा कंफर्टेबल ड्रेस आहेच पण, तरीही मुलामुलींच्या शर्टच्या प्रकारात खुप छोटा फरक आहे. मुलांच्या शर्टवर खिसे असतात तर, मुलींच्या शर्टमध्ये खिसे नसतात (No Pocket on Women’s Shirt). यात काही मोठं सायन्स नसलं तरी,पूर्वी पुरुष प्रधान समाजाच्या रूढीवादी विचारांचा होता आणि त्याचा हा परिणाम आहे असं मानलं जातं. त्यामुळे हा फरक परंपरा आणि मानसिकतेशी संबंधित मुद्दा आहे. ( हे काम कर लागेल मुलांची लाइन; लग्नासाठी मुलगा न सापडणाऱ्या नातीला आजीच्या टिप्स ) जुन्या काळात महिलांच्या शर्टवर पॉकेट्स नसायचे. महिलांच्या कपड्यांमध्ये खिसे असतील तर, त्या नक्कीच खिशात काहीतरी ठेवतील. ज्यामुळे त्यांच्या शरीराची रचना खराब होईल आणि सौंदर्य कमी होईल. अशी एक धारणा होती. त्यामुळे पुर्वीच्या काळापासून मुलींच्या शर्टमध्ये पॉकेट्स बनवलेच जात नव्हते.पुर्वीपासून समाजात रुजलेला हा विचार आजही तसाच आहे. ( कसं शक्य आहे! हृदयाशिवाय तब्बल 555 दिवस जिवंत राहिला हा तरुण ) अजूनही महिलांना केवळ सुंदर दिसणारी वस्तू मानलं जातं ही खेदाची गोष्ट आहे. आता काळानुसार पेहराव बदलला आहे पण, तरीही महिलांनी शर्टवर खिसा ठेवण्याला अजूनही विरोधच होत आहे. ( भाग्यश्री पन्नाशीतही दिसते तितकीच सुंदर; Beauty secret सांगणारा तिचा VIDEO ) मात्र,मुलींना आता सगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या हवेतसे कपडे घालू शकतात. त्यामुळे आता मुलींना वाटत असेल की त्यांच्या शर्टवप पॉकेट असाव तर, नक्कीच तो बदल त्या करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.