मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अभिनेत्री भाग्यश्री पन्नाशीतही दिसते तितकीच सुंदर; Beauty secret सांगणारा तिचा VIDEO VIRAL

अभिनेत्री भाग्यश्री पन्नाशीतही दिसते तितकीच सुंदर; Beauty secret सांगणारा तिचा VIDEO VIRAL

अभिनेत्री भाग्यश्री 52 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

अभिनेत्री भाग्यश्री 52 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

अभिनेत्री भाग्‍यश्री (Actress Bhagyashree) 52 वर्षांची असूनही या वयातही अतिशय सुंदर आणि फिट दिसते. तिने सोशल मीडियावरून (Social Media) आपल्या फॅन्सना काही टिप्स सांगितल्या आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जून : अभिनेत्री भाग्यश्री नेहमीच योगासनाचे व्हिडिओ, कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवर (Instagram page) शेअर करत असते. भाग्यश्री तिच्या फिटनेस आणि सौंदर्यची विशेष काळजी घेते. त्यामुळेच ती 52 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सुंदर दिसण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी ती होम रेमेडीज वापरते. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी भाग्यश्री वेळोवेळी तिच्या चाहत्यांसोबत तिचे ब्युटी सीक्रेट्स (Beauty secrets) शेअर करत असते.

आता तिने कोलेजन बूस्टिंग फूड्सबद्दल (Collagen Boosting Foods) माहिती देण्यासाठी इन्टाग्रामवर एक व्हीडिओ  (Instagram Video) शेअर केला आहे. वाढत्या वयातही तरूण आणि सुंदर दिसायच असेल तर, आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा असं तिने सांगितलंय.भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कोलेजन वाढवणार्‍या पदार्थांची माहिती शेअर केली आहे.

(ऍक्युप्रेशर आणि ऍक्युपंक्चर; खरंच चिनी प्राचीन उपाचार पद्धतीने बरे होतात आजार?)

यामध्ये लिंबूवर्गीय फळं,बेरी,काजू,टोमॅटो,हिरव्या भाज्या, सीफूड आणि मटन सूप घ्यायला सांगितलं आहे. तिने शेअर केलेल्या व्हीडिओचं कॅप्शनही सुंदर आहे. 'यौवन म्हणजे बाह्य सौंदर्य नाही. तर, अंतर्गतही असावं लागतं. कोलेजन शरीरासाठी आवश्यात असणारं प्रोटीन आहे. कोलेजन त्वचेबरोबर स्नायू, सांधे यांच्यावर सुरक्षात्मक आवरण तयार करतं. त्याकरता हेल्दी डाएट घेतला तर आपण जास्त काळ सुंदर आणि हेल्दी राहू शकतो’. असं भाग्याश्रीने लिहीलं आहे.

व्हिटॅमीन सी

शरीरात कोलेजनच्या उत्पादनांसाठी व्हिटॅमीन सी आवश्यक असतं. म्हणूनच आपल्या आहारात आंबट फळं म्हणजे संत्रं, लिंबू, टोमॅटो असायला हवेत. बेरीजमध्येही भरपूर व्हिटॅमीन सी असतं. काजू खाल्ल्याने शरीरात कोलेजन बनवण्याची क्षमता वाढते.

(आता हे कसं करायचं सांगा! रोमान्सवेळी GF च्या विचित्र हट्टामुळे BF ला आलं टेन्शन)

पाया सूप आणि मासे

स्किन ग्लोसाठी पालेभाच्या आपल्या डाएटमध्ये नक्कीच असाव्यात.  सीफूड्स देखील त्वचा, सांधे, हाडं यांच्या मजबूतीसाठी आणि इनका लवचीकता टिकवण्यासाठी गरजेच आहे. पाया सूप मध्ये कॅल्शियम,मॅग्नीशियम, फॉस्फोरस,कोलेजन असे अनेक घटक घटक असतात.

First published:

Tags: Bollywood actress, Instagram post