मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कसं शक्य आहे! हृदयाशिवाय तब्बल 555 दिवस जिवंत राहिला हा तरुण

कसं शक्य आहे! हृदयाशिवाय तब्बल 555 दिवस जिवंत राहिला हा तरुण

त्याच्या शरीरात त्याचं हृदय धडधडतच नव्हतं.

त्याच्या शरीरात त्याचं हृदय धडधडतच नव्हतं.

त्याच्या शरीरात त्याचं हृदय धडधडतच नव्हतं.

मुंबई, 30 जून :  माणसाच्या शरीरातल्या सगळ्याच अवयवांना प्रचंड महत्त्व आहे. सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. हृदय हे शरीरातल्या रक्ताच्या पंपिंगचं काम करतं आणि शुद्ध रक्त शरीरभर पाठवतं. एखाद्या माणसाच्या शरीराचा एखादा अवयव निकामी झाला तर तो अपंग होतो. पण तो जगू शकतो पण जर हे हृदयच जर शरीरात नसेल तर कसं होईल? एखादा माणूस हृदयाशिवाय (Heart) जिवंत राहू शकतो का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. हृदयाशिवाय कसं कोण जिवंत राहू शकतं. पण आम्ही जर म्हटलं की एक माणूस तब्बल 555 दिवस म्हणजे जवळजवळ दीड वर्ष हृदयाशिवाय जिवंत (Man lived 555 days without heart) राहिलाय तर? तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र ही घटना खरी आहे. स्टेन लार्किन असं या तरुणाचं नाव आहे.

25 वर्षीय स्टेन लार्किनच्या शरीरात 2016 मध्ये नवीन हृदय बसवण्यात आलं. त्यापूर्वी दोन वर्षे तो तब्बल 555 दिवस एका कृत्रिम हृदयासोबत जगत होता. त्याला हृदयासंबंधी आजार झाला होता. त्यामुळे त्याचे हृदय ट्रान्सप्लांट (heart transplant ) करणे गरजेचे होते. मात्र, त्याला डोनर मिळत नव्हता. त्यामुळे त्याला कृत्रिम हृदय (artificial heart) बसवण्यात आले होते. कृत्रिम हृदयाला SyncArdia असं म्हणतात.

" isDesktop="true" id="572700" >

स्टेन ते कृत्रिम हृदय असलेली बॅग घेऊन वावरायचा. जिथे जाईल तिथे त्याची बॅग सोबत असायची. एवढंच नव्हे तर त्याची दैनंदिन कामे तो सामान्य व्यक्तींप्रमाणे करत होता. याशिवाय तो मित्रांसोबत बास्केटबॉल देखील खेळत होता.

हे वाचा - आश्चर्य! चक्क हृदयाची धडधड बंद करून वाचवला 9 वर्षांच्या मुलाचा जीव

स्टेनच्या या कृत्रिम हृदयाचे वजन तब्बल 6 किलो होते. त्या सहा किलो वजनाची बॅग पाठीवर घेऊन तो 555 दिवस जगला. जवळजवळ दीड वर्षांनी स्टेनला डोनर मिळाला आणि त्याच्या पाठीवरचं कृत्रिम हृदयाचं ओझं उतरून त्याला खरं हृदय मिळालं. त्याची हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झाल्यानंतर त्याने सायन्स डेलीसोबत बोलताना डोनरचे आभार मानले.

स्टेली म्हणाला की, ‘माझ्यासाठी हे 555 दिवस फार भावनिक आणि चढ-उतारांनी भरलेले होते. दोन आठवड्यांपूर्वी माझं हार्ट ट्रान्सप्लांट झालं. मला बोलताना धावत असल्यासारखं वाटतंय. मी मला हृदय दान करणाऱ्या डोनरचे आभार मानतो. मी एक दिवस त्याच्या कुटुंबीयांना नक्कीच भेटेन. मला आशा आहे की ते देखील मला भेटण्यास उत्सुक असतील,’ असं म्हणत स्टेन भावूक झाला होता.

हे वाचा - न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय? दुर्लक्ष केल्याने होतील वाईट परिणाम

स्टेन लार्किनच्या घरात त्याचा भाऊ डॉमिनिकलादेखील हृदयासंबंधी आजार होता. त्यालादेखील कृत्रिम हृदय बसवण्यात आले होते. मात्र डोनर लवकर मिळाल्याने त्याचं हार्ट ट्रान्सप्लांट लवकर झालं. तुलनेने स्टेनला तब्बल 555 दिवस कृत्रिम हृदयासोबत जगावे लागले. स्टेनने 2016 मध्ये मिशिगन विद्यापीठातील फ्रँकल कार्डियोव्हॅस्कुलर सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, ‘सिंकार्डिया (SyncArdia) आर्टिफिशियल हार्टने मला पुनर्जन्म दिला आहे आणि आधीपेक्षा जास्त हेल्थी बनवलं आहे.’

First published:

Tags: Health, Lifestyle