Home /News /lifestyle /

पत्नीला सेक्समध्ये नाही रस; HSDD असू शकतं कारण

पत्नीला सेक्समध्ये नाही रस; HSDD असू शकतं कारण

पत्नीच्या उदास राहण्याची कारणं शोधा.

पत्नीच्या उदास राहण्याची कारणं शोधा.

पत्नी इंटीमसीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असेल तर, चिडचिड करण्यापेक्षा त्याची कारणं शोधायला हवीत

    दिल्ली, 31 मे: एका चांगल्या रिलेशनशीपसाठी (Relationship) पतीपत्नीमध्ये जेवढ भावनिक नातं (Emotional relationship) महत्वाचं असतं. तेवढच शरीर संबंधांनाही महत्व असतं. दोघांसाठी भावनिक गुंतवणूक टिकून राहण्यासाठी सेक्शुअल रिलेशनलाही (Sexual Relations) महत्व आहे. स्त्री आणि पुरूषांच्या याबाबतीतल्या अपेक्षा (Expectations) आणि गरजा (Needs)वेगवेगळ्या असल्या तरी, आवश्यकता दोघांनाही असते. पतीपत्नीच्या नात्यात रोमान्सही महत्वाचा आहे.पण, कालांतराने नात्यातलं आकर्षण कमी व्हायला लागतं. त्यामुळे पत्नी सेक्ससाठी नकार द्यायला लागते. अशा वेळेस पुरूषांच्या मनात अनेक शंका येतात. आज याच संदर्भातल्या कारणांची माहिती घेऊयात. पुरुषांपेक्षा महिलांना शारीरिक संबंध बनवण्याची इच्छा कमी होत जाते. महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं एक महत्वाच कारण आहे.  ज्याला हाइपोएक्टिव्ह सेक्शुअल डिझायर डिसऑर्डर (HSDD) म्हणतात. त्यामुळे महिलांची सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते. लैंगिक संबंधापासून दूर जाण्यामागे मानसिक कारणं असू शकतात आणि काही टिप्सच्या मदतीने ही समस्या दूर केली जाऊ शकते. (एकटी नारी तरुणांवर पडली भारी! छेड काढताच घडवली अशी अद्दल; कुणीच करणार नाही नाद) HSDDची लक्षणं स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा नसणं,कामेच्छा कमी होणं, सेक्ससाठी पुढाकार न घेणं अशी लक्षणं दिसत असतील तर, त्याची काही कारणं असू शकतात. शरीरात हार्मोनल बदल, वयानुसार सेक्शुअर हार्मोनमध्ये घट, गर्भधारणा आणि स्तनपान,रजोनिवृत्ती,तणाव, जोडीदाराशी वाद, सेक्शुअर ट्रॉमा अशी कारणं असू शकतात. महिलांची कामेच्छा वाढवण्यासाठी उपाय स्त्रियांमध्ये सेक्स ड्राईव्हवर उपचार करण्यासाठी, त्यामागील कारण जाणून घेणं खूप महत्वाचे आहे.त्यानुसार उपायही करता येतात. (लग्न लागता लागता निघाला नवरीचा मेकअप; पाहताच नवऱ्याने मग काय केलं पाहा VIDEO) एक्ससाईज पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा निर्माण करण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. एक्सरसाईजमुळे आपलं शरीरं सुडौल होतं त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. यामुळे सेक्ससाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सची पातळी वाढवते. उदासीनता पत्नीच्या उदास राहण्याची कारणं शोधा. डिप्रेशनमध्ये असलेल्या माणसाचा मूड आणि वागणं नकारात्मक होऊ शकतो. अशावेळी तिच्याशी चर्चा करून तिला मदत करा. (कोरोनाची लस घेतल्यावर किती दिवस करू नये सेक्स? वाचा शास्त्रज्ञांचा सल्ला) नाराजी पत्नी नाराज,नाखुश असेल तर, तिचा सेक्स करण्याचा मूड नसेल. अशावेळी तिच्या बोलून नाराजीचं कारण जाणून घ्या आणि तिची नाराजी दूर करा. सेक्समध्ये नावीन्य सेक्स करताना नेहमीचा तोचतोपणा जाणवत असेल तर, त्याबद्दलही पत्नीबरोबर बोला. एकाचवेळी, एकाच ठिकाणी, त्याच नेहमीच्या सवयीने सेक्स केल्यावर त्यातील नावीन्य आणि आकर्षण संपल्यासारखं वाटत असेल तर, इंटीमसीसाठी नवीन गोष्टी ट्राय करा. ज्यामुळे तिचा उत्साह वाढेल. (दररोज ‘या’ भाज्या आणि फळं खा; थायरॉईड येईल नियंत्रणात) व्यसनं एखाद्या महिलेला धुम्रपान किंवा मद्यपानाची सवय असेल तर,त्याचाही परिणाम सेक्स लाईफवर होतो. त्यामुळे व्यसनं सोडून द्या. याशिवाय काही शारीरिक समस्या असतील तर, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sexual health, Sexual relationship, Women

    पुढील बातम्या