मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लग्न लागता लागता निघाला नवरीचा मेकअप; पाहताच नवऱ्याने मग काय केलं पाहा VIDEO

लग्न लागता लागता निघाला नवरीचा मेकअप; पाहताच नवऱ्याने मग काय केलं पाहा VIDEO

मंडपात नवरीचा मेकअप बिघडला आणि मग...

मंडपात नवरीचा मेकअप बिघडला आणि मग...

मंडपात नवरीचा मेकअप बिघडला आणि मग...

मुंबई, 12 जुलै: लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनमोल असा क्षण असतो. विशेषतः तरुणींसाठी हा दिवस खूपच खास असतो. त्यामुळे अगदी लग्न (Wedding video) ठरल्यापासून ते लग्नाच्या दिवसापर्यंत त्यांची तयारी सुरूच असते. त्यातही महत्त्वाचा असतो म्हणजे मेकअप (Wedding makeup). आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं यासाठी मेकअप तरुणी कितीतरी रुपये खर्च करतात. पण हाच मेकअप जर लग्नातच खराब झाला तर... अशाच एका नवरीचा (Bride) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे.

लग्न लागत असताना मंडपात नवरीचा मेकअप (Bride makeup) उतरू लागला. नवरीला (Bride video) आपल्या लग्नापेक्षा जास्त चिंता मेकअपचीच होती. त्यावेळी नवऱ्याने (Groom) नेमकं काय केलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत पाहू शकता, नवरीच्या नाकावरील मेकअप बिघडला आहे आणि त्यामुळे ती टेन्शनमध्ये आली आहे. त्यानंतर नवरा आपल्या हातात मेकअप ब्रश घेतो आणि तिच्या नाकावरील मेकअप ठिक करतो. थोडासा तो टचअप करतो. त्यानंतर तो शेजारीच असलेल्या ब्युटिशिअनच्या हातात पुन्हा ब्रश देतो. मग नवरी आपल्या हातातील रूमालाने नाक थोडंसं पुसताना दिसते. त्यावेळी ती ब्युटिशिअनकडेही पाहते.

हे वाचा - ढसाढसा रडली आणि निघाला मेकअप; नवरीचं खरं रूप दिसताच नवऱ्यानं काय केलं पाहा VIDEO

ब्युटिशिअनचा आवाजही येतो, की तू टेन्शन घेऊ नकोस काही होत नाही. मी नंतर मेकअप ठिक करेन. पण नवरी थोडी रागातच दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. बिघडलेला मेकअप तिला अजिबात सहन होत नाही आहे, हेच तिच्या चेहऱ्यावरून दिसून येतं आहे. पण आपल्या नवऱ्याने आपला मेकअप ठिक करायला मदत केली, याचाही आनंद तिच्या चेहऱ्यावर आहे.

हे वाचा - लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; बकाबक खाताना VIDEO

दुल्हनिया इन्स्टाग्रामा अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Funny video, Viral, Viral videos, Wedding couple, Wedding video