Home /News /lifestyle /

मास्क आणि लशींना विरोध; भारतातील Anti-Mask Movement चं काय आहे कारण

मास्क आणि लशींना विरोध; भारतातील Anti-Mask Movement चं काय आहे कारण

कोरोनापासून बचावासाठी सध्या मास्क (mask) महत्त्वाचा असताना आणि सर्वांचे डोळे कोरोना लशीकडे (corona vaccine) लागलेले असताना काही लोक मात्र या दोन्ही गोष्टींना विरोध करताना दिसत आहेत.

    मुंबई, 07 ऑक्टोबर : जगभरात सध्या कोरोनाव्हायरस (coronavirus) धूमाकूळ घालत आहे. या व्हायरसचा धोका आणि प्रसार कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कचा (mask) वापर करण्यात येत आहे. शिवाय अनेकांचे डोळे कोरोना लशीकडे (corona vaccine) लागले आहेत. असं असताना काही जण लशीला आणि मास्कला विरोध करताना दिसत आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे? एकोणिसाव्या शतकात प्लेगच्या साथीमध्ये इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात इंग्लंडमधील औषधं भारतात विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर त्यांच्या विविध पद्धतींचा अवलंब करून प्लेगची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता या कोरोनाच्या संकटात देखील सरकार अशाच प्रकारे नागरिकांवर मास्कचा वापर आणि लसीची सक्ती करत असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध नियम बनवले आहेत. यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रुपने मुंबईच्या मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर याविरोधात आंदोलन केेलं. आंदोलनात सहभागी असलेला योहान टेंगरा म्हणाला, "आम्ही मास्कच्या सक्तीविरोधात आहोत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्क खूप उपयोगाचे नाहीत. त्याचबरोबर सतत मास्क वापरल्याने इतरदेखील समस्या निर्माण होत आहेत. मास्क घालायचा की नाही हा निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार हवा" योहान टेंगरा हा पुण्यातील एका Functional Nutrition Clinic मध्ये संशोधक म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर मास्क घातल्यामुळं कोरोनापासून सरंक्षण होतं असा कुठेही निष्कर्ष निघाला नसल्याचं देखील त्यानं म्हटलं. हे वाचा - 4 दिवसांतच डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; असे नेमके काय दिले उपचार त्याचबरोबर दिल्लीमधील डॉक्टर आणि Indo-American health care चे डायरेक्टर तरुण कोठारी यांनी देखील मास्कविषयी शंका उपस्थित केली आहे. मास्क घातल्याने ऑक्सिजन कमी प्रमाणात शरीरात जातो. तसेच कार्बन डायऑक्सइडचं शरीरातील प्रमाण वाढतं. यामुळं N95 मास्क किंवा कापडी मास्क वापरला तरीही कोरोनाचा विषाणू हा 100 नॅनोमीटर इतका सूक्ष्म असल्याने तो या दोन्ही मास्कमधील छिद्रांतून माणसाच्या तोंडा-नाकापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कुठल्याही मास्कमुळे कोरोनापासून सरंक्षण मिळू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा - मोदी सरकारनं आणलं AYUSH 64; कोरोना रुग्णांसाठी प्रभावी आयुर्वेदिक औषध Corona Pandemic Scandal या त्यांच्या पुस्तकात त्यांनी या संदर्भातील आधिक खुलासा केला आहे. भारतातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपदेखील त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. मास्क घातल्याने ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे याचा परिणाम आपल्या शरीरातील सर्व अवयवांवर होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या