जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 4 दिवसांतच डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; असे नेमके काय दिले त्यांना उपचार

4 दिवसांतच डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; असे नेमके काय दिले त्यांना उपचार

कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी ट्रम्प  यांना  निवडणुकीच्या रॅलीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी ट्रम्प यांना निवडणुकीच्या रॅलीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना Experimental therapy देण्यात आली, असं सांगितलं जातं आहे. म्हणजे नेमकं काय आणि त्यांच्यावर कसे उपचार झाले पाहा.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 06 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसवरील (Coronavirus) उपचारांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सोमवारी ते व्हाइट हाउसमध्ये परतले. त्यावेळी त्यांनी आपल्या नाकावरचा मास्क काढला आणि आपण कोरोनातून बरे झालो आहोत, असंच त्यांनी दाखवून दिलं. वॉल्टर रिड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमधून उपचार घेऊन ट्रम्प परतल्यामुळे जगभरातील आणि अमेरिकेतील अनेक शास्रज्ञांनीही त्यांच्यावर जबरदस्त टीका केली. त्यांच्यावर झालेल्या उपचारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरुवातीला ते व्हाइट हाउसमध्येच राहणार असल्याचं त्यांचे डॉ. सिएन कॉन्ले यांनी सांगितलं होतं. पण नंतर त्यांना वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ट्रम्प यांना झिंक, व्हिटॅमिन डी, अँटॅसिड आणि अॅस्प्रिन ही औषधं देण्यात आली असं असोसिएट प्रेसनं सांगितलं.  ट्रम्प त्यांना रेमडेसिवीर, डेक्सामेथासोन, फॅमोटिडाइन तसंच ऑक्सिजन थेरेपी देण्यात आली असंही असोसिएटेड प्रेसच्या बातमीत म्हटलं आहे. रिजनेरॉन (Regeneron) रिजनेरॉन औषधाचं सध्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या औषधातील दोन मोनोक्लोनल अँटिबॉडी कोरोनाच्या विषाणूला निष्क्रिय करतात असा औषध तयार करणाऱ्या कंपनीचा दावा आहे. ट्रम्प यांना REGN-COV2 चा सिंगल डोस देण्यात आला, असं ग्लोबल न्यूजने सांगतिलं. डेक्सामेथासोन (Dexamethasone) डेक्सामेथासोन हे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे आणि त्यावर ब्रिटनमध्ये क्लिनिकल ट्रायल  सुरू आहेत. कोव्हिडमुळे गंभीर आजारी म्हणजे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जातं. हे औषध ट्रम्पना दिल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती, हे सिद्ध होतं. रेमडेसिवीर (Remdesivir) कोरोनाव्हायरसवरील उपचारासाठी वापरलं जाणारं हे अँटिव्हायरल औषध आहे. ट्रम्प यांच्यावरील पाच दिवसांच्या उपचारांदरम्यान हे औषध वापरलं जाईल असं त्याच्या वैद्यकीय टीमने आधी सांगितलं होतं. रेमडेसिवीरमुळे रुग्णांच्या तब्येतीत प्लासिबो औषधांच्या तुलनेत खूप गतीने सुधारणा होतं असं क्लिनिकल ट्रायलमध्ये सिद्ध झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात