मुंबई 01 डिसेंबर : दुःखाचा क्षण असो की आनंदाचा, दोन्ही वेळी आजकाल अनेकांच्या सोबत एक गोष्ट असते, ती म्हणजे दारू. कोणी मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दारू पितो, तर कोणी एखादं दु:ख विसरायचं आहे, असं कारण देत दारू पितो. पण तुम्हाला माहिती आहे का, दारू जितकी जुनी असते तितकीच ती महाग असते. या मागील नेमकं कारण काय आहे, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ‘एबीपी न्यूज’ने याबाबत वृत्त दिलंय.
आजकाल बरेचजण दारू पितात. दारूच्या दुकानात लोकांना जुनी दारू मागताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, किंवा निदान तसं ऐकलं तरी असेल. दारूचा रंग जितका गडद तितकी त्यात नशा जास्त असते, असं म्हटलं जातं. सहसा एखादी गोष्ट जुनी झाली की, लोकांचा त्यामध्ये रसही कमी होतो. पण दारूच्या बाबतीत असं होत नाही. उलट जुन्या दारूला मागणी जास्त असते. चला तर, जुनी दारू व नवीन दारूमध्ये काय फरक आहे? लोकांना जुनी दारू चांगली का वाटते? याबाबत जाणून घेऊया.
Good Quality Sleep : काय असते गुड क्वालिटी स्लिप? हे संकेत सांगतील कशी आहे तुमची झोप
जुन्या दारूची ही आहेत वैशिष्ट्यं
जुन्या दारूचा रंग नवीन दारूपेक्षा किंचित गडद असतो, आणि तिची चवही नव्या दारूपेक्षा खास असते. दारू जेवढी जुनी होते, तेवढीच तिची चव खास होत जाते. त्यामुळेच दारूचे शौकीन असलेल्या लोकांमध्ये जुन्या दारूला मोठी मागणी आहे. जुन्या व नव्या दारूच्या किंमतींमध्येही खूप तफावत आहे. जुन्या दारूची किंमत नवीन दारूपेक्षा किंचित जास्त असते. उदाहरणार्थ, 50 वर्षांपूर्वीची स्कॉच असेल, तर ती 10 वर्षांच्या स्कॉचपेक्षा खूपच महाग असते.
ब्रँडी, व्हिस्कीबाबत ‘हे’ माहिती आहे का?
ब्रँडी आणि व्हिस्की या दोन भिन्न प्रकारच्या दारू आहेत. या दोन्ही प्रकारच्या दारूना एजिंगची (काही काळ दारू साठवून ठेवणं) आवश्यकता असते. या दारूवर किमान तीन वर्षे एजिंगची प्रक्रिया केली जाते. रम आणि टकिला या प्रकारसाठीही एजिंगची प्रक्रिया केली जाते.
Women Health : महिलांना ब्रेस्ट बाबतीत या चुका करणं पडू शकतं महाग; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
म्हणून लोकांना आवडते जुनी दारू
जुन्या दारूचा रंगही काळाबरोबर गडद होत जातो. जेव्हा दारू जुनी होते, तेव्हा तिच्या रंगाबरोबरच चवीलाही एक विशेष प्रकारची परिपक्वता येते. दारू जुनी आणि परिपक्व करण्यासाठी, एक विशेष प्रक्रियादेखील केली जाते, ज्याला एजिंग असं म्हणतात. जुन्या दारूचा हँगओव्हर हळूहळू वाढतो, असंही म्हटलं जातं.
दरम्यान, दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक असलं तरीही, जगात मोठ्या संख्येनं लोक दारूचं सेवन करतात. त्यातही यामध्ये जुन्या दारूला पसंती देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Liquor stock