जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Good Quality Sleep : काय असते गुड क्वालिटी स्लिप? हे संकेत सांगतील कशी आहे तुमची झोप

Good Quality Sleep : काय असते गुड क्वालिटी स्लिप? हे संकेत सांगतील कशी आहे तुमची झोप

Good Quality Sleep : काय असते गुड क्वालिटी स्लिप? हे संकेत सांगतील कशी आहे तुमची झोप

शरीराला चांगल्या झोपेची गरज असते. मात्र गुड क्वालिटी स्लिप म्हणजे नेमकं काय? शांत आणि गाढ झोप लागणं म्हणजेच गुड क्वालिटी स्लिप असते. तुम्ही गुड क्वालिटी स्लिप घेत आहात हे तुम्ही काही लक्षणांवरून ओळखू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 नोव्हेंबर : लोकांना रात्री पुरेशी झोप न मिळण्याची अनेक कारणे आहेत. परीक्षा, ऑफिस मीटिंग किंवा इतर कार्यक्रमांची तयारी करणारे लोक कमी झोप घेतात. विविध अभ्यासानुसार, चांगले आरोग्य राखण्यासाठी किमान 7 तासांची झोप आवश्यक आहे. एका अभ्यासात हेदेखील आढळून आले आहे की, प्रति रात्र 7 तासांपेक्षा कमी झोपणे एखाद्याच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. म्हणूनच झोपेचे आणि त्यातही चांगल्या झोपेचे अनेक फायदे असतात. तसेच शरीराला चांगल्या झोपेची गरज असते. मात्र गुड क्वालिटी स्लिप म्हणजे नेमकं काय? शांत आणि गाढ झोप लागणं म्हणजेच गुड क्वालिटी स्लिप असते. तुम्ही गुड क्वालिटी स्लिप घेत आहात हे तुम्ही काही संकेत किंवा लक्षणांवरून ओळखू शकता. ती लक्षणं खालील प्रमाणे आहेत.

सतत आजारी पडत असाल तर झोपताना करा हा उपाय; उशीखाली या वस्तू ठेवून परिणाम पाहा

गुड क्वालिटी स्लिपचे संकेत - तुम्हाला अंथरुणावर पडल्यानंतर 10 ते 15 मिनिटांत झोप येत असेल. तर तुम्ही गुड क्वालिटी झोप घेत आहात. मात्र जर तुम्ही बेडवर पडल्यानंतर केवळ कूस बदलत झोपण्याचा प्रयत्न करत असाल. तर तुम्हाला तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे.

News18लोकमत
News18लोकमत

- जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता, तेव्हा तुमचे शरीर स्वतःला दुरुस्त करते आणि आवश्यक झोप घेतल्याने तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होतात. त्यानंतर तुम्हाला सकाळी उठण्यासाठी अलार्मची गरज पडत नाही. - तुम्ही एकदा झोपलात की थेट सकाळीच उठत असाल तर म्हणजेच तुमची झोप रात्री मध्ये मध्ये तुटत नसेल. तर तुम्ही चांगल्या दर्जाची झोप घेत आहात. मात्र तुमची झोप सारखी मोडत असेल तर तुम्हाला चांगल्या झोपेची गरज आहे. - जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता तेव्हा तुम्हाला तुमची स्वप्ने आठवत नाहीत. अभ्यासात असे दिसून आले आहे की जर तुम्ही तणावाखाली असाल आणि नीट झोप येत नसेल तर तुम्हाला तुमची स्वप्ने आठवण्याची शक्यता जास्त असते.

Food Causing Sleeplessness : या पदार्थांमुळे झोपेचं खोबरं होतं; रात्रीच्या वेळी चुकूनही खाऊ नका

- हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता तेव्हा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उत्साही आणि ताजेतवाने वाटते. मात्र तुम्हाला सकाळी उठल्यानंरही आळस येत असेल तर तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता निश्चितच सुधारली पाहिजे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात