जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इतर बोटांप्रमाणे एकट्या अनामिकेची हालचाल होत नाही; Ring Finger मध्ये असं काय आहे?

इतर बोटांप्रमाणे एकट्या अनामिकेची हालचाल होत नाही; Ring Finger मध्ये असं काय आहे?

इतर बोटांप्रमाणे एकट्या अनामिकेची हालचाल होत नाही; Ring Finger मध्ये असं काय आहे?

अनामिका म्हणजेच रिंग फिंगर जे करंगळीच्या शेजारी असतं. हे बोट इतर बोटांप्रमाणे सहज फिरवता येत नाही.

    मुंबई, 13 जुलै : आपल्या शरीराचा (Human Body) कोणताच अवयव निरुपयोगी नाही. आपल्या हाताला आणि पायाला असलेली सगळी बोटंही कामाची आहेत. कोणत्याही बोटाला आपण निरुपयोगी किंवा कामाचं नाही, असं म्हणू शकत नाही. दैनंदिन कामात प्रत्येक बोटाला (Fingers) महत्त्व आहे; पण आपल्या हाताची सर्व बोटं सारखी नाहीत. त्याचप्रमाणे इतर बोटं ज्याप्रमाणे सहज हलवता येतात, तसं अनामिका हे बोट मात्र स्वतंत्रपणे हलवता येत नाही (Ring Finger). अनामिका म्हणजेच रिंग फिंगर म्हणजेच करंगळीच्या शेजारचं बोट होय. या बोटाची हालचाल सहज करता येत नाही. तुमच्या ही बाब कधी लक्षात आली आहे का? नसेल तर करून पाहा. हे बोट तुम्हाला इतर बोटांइतकं सहज फिरवता येणार नाही. आता यामागचं कारण नेमकं काय आहे, ते आपण जाणून घेऊ. खरं तर, मानवी शरीर खूप गुंतागुंतीचं आहे. आपले काही अवयव संपूर्ण शरीर चालवतात. अनामिका बोटाबद्दलही तसंच आहे. म्हणजे हे बोट एकटं उचलायचं असेल तर तसं करता येत नाही. त्या बोटात ताकद नसल्याचं जाणवतं; पण जेव्हा बाकीच्या बोटांसोबत ते बोट सरळ करता किंवा इतर हालचाल करता, तेव्हा त्याची हालचाल लगेच होते. असं होण्यामागचं कारण आपल्या हातातले स्नायू हे आहे. हे वाचा -  डॉक्टरांनी केली कमाल! दोन्ही किडनी शरीराच्या एकाच भागात जोडून वाचवला रुग्णाचा जीव अंगठा (Thumb) हे सर्वांत लवचिक बोट आहे. त्याचं कारण म्हणजे अंगठ्याचे स्नायू वेगळे असतात, ते त्याला मुक्तपणे हलण्यास मदत करतात. अंगठ्याखाली अनेक स्नायू असतात. त्यामुळे त्याची हालचाल सहज होण्यास मदत होते. याशिवाय हाताच्या मागच्या बाजूला काही स्नायू असतात जे वाकलेल्या पोझिशनमधून सरळ होण्यास मदत करतात. याशिवाय सर्वांत लहान बोट म्हणजेच करंगळीला काही प्रकारच्या हालचालींसाठी स्वतंत्र स्नायू असतात, तर काही हालचालींसाठी तिला आधीच्या तीन बोटांवर अवलंबून राहावं लागतं. हे वाचा -  Knee Pain Relief : आता वेदनेला म्हणा बाय-बाय; ‘हे’ आहेत गुडघेदुखीवर रामबाण उपाय इंडिया टाइम्स वेबसाइटच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार की  हाताच्या चार बोटांची हालचाल हातामध्ये असलेल्या दोन स्नायूंद्वारे केली जाते. त्यांना लाँग फ्लेक्सर्स म्हणतात; पण पहिल्या बोटाला एक टेंडॉन जोडलेला असतो, तो हाड आणि स्नायूंना जोडतो. अशा प्रकारे हाताच्या पहिल्या तीन बोटांची हालचाल सहज होते; पण अनामिका बोटाला उचलू शकणारे वेगळे किंवा स्वतंत्र स्नायू नसतात. त्यामुळे जेव्हा मूठ बंद असते, तेव्हा एकट्या अनामिकेला उचलण्यासाठी हातांवर दबाव येतो आणि करंगळीसह मधलं बोट हालचाल करत वर येऊ लागते. करंगळी आणि अनामिका यांच्या नर्व्ह्ज एकमेकांमध्ये अडकलेल्या असतात. यामुळे कोणतंही एक बोट उचलण्याच्या प्रयत्नात दुसरं बोट वर येऊ लागतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात