मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डॉक्टरांनी केली कमाल! दोन्ही किडनी शरीराच्या एकाच भागात जोडून वाचवला रुग्णाचा जीव

डॉक्टरांनी केली कमाल! दोन्ही किडनी शरीराच्या एकाच भागात जोडून वाचवला रुग्णाचा जीव

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

डॉक्टरांनी रुग्णावर ऑटो किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 12 जुलै :  आपल्या शरीरात दोन किडनी असतात. त्यापैकी एक डाव्या आणि एक उजव्या बाजूला असते हे आपल्याला माहितीच आहे. पण डॉक्टरांनी एका रुग्णाच्या शरीरातील एका बाजूची किडनी काढून दुसऱ्या बाजूला लावली (Auto-Kidney Transplant). दोन्ही किडनी एकत्र करून डॉक्टरांनी या रुग्णाचा जीव वाचवला आहे. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी ही अनोखी शस्त्रक्रिया केली. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.

किडनी ट्रान्सप्लांट तुमच्यासाठी आता नवं नाही. किडनी निकामी झाली किंवा काही आजार-समस्यांमुळे किडनीने कार्य करणं बंद केलं, तर किडनी प्रत्यारोपण केलं जातं. ज्यात दुसऱ्या कुणाची तरी किडनी रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केली जाते आणि त्याचा जीव वाचवला जातो आहे. पण या प्रकरणात मात्र रुग्णामध्ये त्याचीच किडनी प्रत्यारोपित करण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही किडनी एकाच ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. यालाच ऑटो किडनी ट्रान्सप्लांट  म्हटलं जातं. ज्यात रुग्णाच्या शरीरातील किडनी काढून त्याच्या शरीराच्या दुसऱ्या भागात प्रत्यारोपित केली जाते. पंजाबमधील 29 वर्षांच्या तरुणावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

या तरुणाला मूत्रवाहिनीत स्टोनची समस्या होती.  त्याने स्थानिक डॉक्टरांकडून यावर उपचार करून घेतले. त्याच्या मूत्रवाहिनीतील स्टोन बाहेर काढण्यात आले पण त्यासोबतच डाव्या बाजूची मूत्रवाहिनीही बाहेर आली. त्यामुळे मूत्राशय आणि किडनीला जोडणारी ही मूत्रवाहिनी त्याच्या शरीरात नव्हती. या रुग्णाची 25 सेंटीमीटर मूत्रवाहिनी गायब होती.

हे वाचा - 4 कोटी उधळून केल्या तब्बल 40 सर्जरी; मॉडेलसारखं दिसण्याच्या नादात महिलेची आता अशी अवस्था झाली की...

झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. विपीन त्यागी यांनी सांगितलं की, सामान्यपणे व्यक्तीची एक किडनी डाव्या आणि एक उजव्या बाजूला असते. या किडनींना मूत्राशयाला जोडणाऱ्या दोन मूत्रवाहिन्या असतात. पण या रुग्णाच्या शरीरात डाव्या बाजूची किडनी मूत्रवाहिनीविनाच होती, हे पाहून आम्ही हैराण झालो.

यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर चड्ढा यांच्या मते, या रुग्णाची किडनी काढून टाकावी किंवा किडनी आणि मूत्राशयात गायब झालेला भाग पुन्हा बनवून जोडावा किंवा ऑटो ट्रान्सप्लांट असे पर्याय आमच्याकडे होते. रुग्ण तरुण होता आणि आतड्यांपासून मूत्रवाहिका पुन्हा तयार करणं योग्य नव्हतं. त्यामुळे आम्ही ऑटो किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. यानुसार या रुग्णाची डाव्या बाजूची किडनी काढून उजव्या बाजूला शक्य तितकी मूत्राशयाजवळ आणण्यात आली. ही किडनी आणि मूत्राशयात 4 ते 5 सेमीचं अंतर होतं. मूत्राशयाच्या वरील आवरण वापरून इतक्या लांबीची नवी ट्युब तयार ककेली आणि ती किडनी, मूत्राशयाला जोडली. ज्यामुळे किडनीतील रक्तप्रवाह आणि मूत्रविसर्जनाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.

हे वाचा - Knee Pain Relief : आता वेदनेला म्हणा बाय-बाय; 'हे' आहेत गुडघेदुखीवर रामबाण उपाय

आता रुग्णाच्या दोन्ही किडनी उजव्या बाजूलाच आहेत. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर तो ठिक झाला आहे. त्याला हॉस्पिटलमधून ़डिस्चार्जही देण्यात आला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle