मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Corona Vaccination : मोदी सरकारने फक्त 45+ व्यक्तींनाच कोरोना लस देण्याचा निर्णय का घेतला?

Corona Vaccination : मोदी सरकारने फक्त 45+ व्यक्तींनाच कोरोना लस देण्याचा निर्णय का घेतला?

45 वर्षांवरील व्यक्तींनाच लस घेण्याची परवानगी दिली आहे मग त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कोरोनापासून संरक्षण कसं मिळणार?

45 वर्षांवरील व्यक्तींनाच लस घेण्याची परवानगी दिली आहे मग त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कोरोनापासून संरक्षण कसं मिळणार?

45 वर्षांवरील व्यक्तींनाच लस घेण्याची परवानगी दिली आहे मग त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कोरोनापासून संरक्षण कसं मिळणार?

नवी दिल्ली, 02 एप्रिल : देशभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (CORONAVIRUS) पुन्हा वेगाने होऊ लागला आहे. त्याच वेळी देशभरात लसीकरण कार्यक्रमाचा (Vaccination Drive) वेगही वाढवण्यात आला आहे. दर दिवशी लाखो लोकांना कोरोना प्रतिबंधक (Covid19 Vaccine) लस दिली जात आहे. पण फक्त 45 वर्षांवरील व्यक्तींनाच लस (Corona vaccine for above 45 years old people) घेण्याची परवानगी का दिली आहे? त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कोरोनापासून संरक्षण कसं मिळणार?

या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'न्यूज 18 हिंदी'ने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) 'टास्क फोर्स ऑपरेशन ग्रुप फॉर कोविड'चे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा (Dr. N. K. Arora) यांच्याशी संवाद साधला. 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोरोनासंदर्भातली आकडेवारी आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे घेण्यात आला होता. त्या संदर्भातील अधिक माहिती डॉ. अरोरा यांनी दिली.

45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 88 टक्के कोरोना बळी

कोरोनाच्या आकडेवारीच्या अभ्यासातून आढळून आलं की, देशातल्या कोरोनोबाधितांच्या मृतांमध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींचं प्रमाण जास्त आहे आणि त्यातही 60 वर्षांवरील व्यक्तींचं प्रमाण मोठं आहे. 60 वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. तसंच कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींपैकी 88 टक्के व्यक्ती 45 वर्षांवरील आहेत.

60 वर्षांवरील व्यक्तींच्या मृत्यूचं प्रमाण 60 वर्षांवरील व्यक्तींच्या मृत्यूच्या तुलनेत 16 ते 17 टक्के अधिक आहे. तसंच, 45 वर्षांच्या वरील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाधितांच्या मृत्यूंपेक्षा 12 ते 13 टक्के जास्त आहे. या सगळ्याचा मथितार्थ असा, की 45 वर्षांवरील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र त्या वयोगटातल्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण खूप कमी आहे, असं डॉ. अरोरा म्हणाले.

हे वाचा - कोरोना रुग्णांनी ओलांडला 45000 चा टप्पा; रिकव्हरीच्या दुप्पट पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोनाबाधितांच्या मृत्यूची आकडेवारी पाहिल्यानंतर केंद्र सरकारने सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य सेवेतले डॉक्टर्स, नर्सेस, त्यांच्यानंतर सर्व क्षेत्रांतले कोरोना योद्धे (Frontline Workers), त्यानंतर 60 वर्षांवरील व्यक्ती आणि अन्य व्याधी असलेल्या 45 वर्षांवरील (Co-Morbid) व्यक्ती आणि त्यानंतर आता एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी कोरोना लसीकरण सुरू केलं आहे. कोरोना संसर्गाचा विचार केला, तरी संसर्ग होण्याचं प्रमाणही 45 वर्षांवरील व्यक्तींमध्येच जास्त आहे, असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.

लोकांची उदासीनता

डॉ. अरोरा म्हणतात, की कोरोनाचा एवढा प्रकोप होऊनही देशातल्या 60 वर्षांवरच्या केवळ 20 ते 25 टक्के व्यक्तींनीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. यातून लोकांची उदासीनता दिसते. या स्थितीसाठी डॉ. अरोरा यांनी युवा वर्गाला जबाबदार धरलं.

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रिया स्वतः करण्यात अडचणी येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांनी जबाबदारी घेऊन त्यांच्या आई-वडिलांना, घरातल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी न्यायला हवं, असं ते म्हणतात.

हे वाचा -  लॉकडाऊन, लसीकरणाबाबत काय म्हणाले CM उद्धव ठाकरे; 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

कोरोनापासून वाचायचं असेल, तर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांचं (Preventive Measures) संपूर्ण पालन किंवा लस घेणं. ज्येष्ठ नागरिक आपल्या आरोग्याविषयी उदासीन आहेत, ही गोष्ट चिंताजनक आहे. आकडेवारी असं सांगते, की कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मोठ्या शहरांत सापडले आहेत. त्याच शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्याचं प्रमाण खूप कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत लोक सहभागी होत नाहीत. खरं तर असं होता कामा नये.

कोरोना प्रतिबंधासाठी लस प्रभावी आहे. संरक्षणाचा तो चांगला उपाय आहे. त्यामुळे देशभरातल्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन लसीकरण करून घेतलं पाहिजे. सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, त्याचा लाभ घेतला पाहिजे, असं आवाहन डॉ. अरोरा यांनी केलं आहे.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccination