पुण्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा दिवसभरात उच्चांकी 9086 कोरोना रूग्णवाढ झाली आहे. दैनंदिन मृत्यू संख्याही 58 वर पोहोचली आहे. पुणे शहरात 4653, पिंपरी-चिंचवडमध्ये 2463 तर ग्रामीण भागात 1383 नवे रुग्ण सापडले. एकट्या पुणे शहरात 37 हजार 126 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल साडे पाच लाखांवर पोहोचला आहे.
अमरावतीतही कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज 275 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 4 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात 453 रुग्णांनी केली कोरोनावर मात केली. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 45366 वर पोहोचली आहे. आता एकूण 49198 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि एकूण 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.