जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Kojagiri Purnima 2021: रात्रीचं जागरण, मसाला दूध, चंद्र कसं आहे कोजागरीचं या सगळ्याशी नातं?

Kojagiri Purnima 2021: रात्रीचं जागरण, मसाला दूध, चंद्र कसं आहे कोजागरीचं या सगळ्याशी नातं?

Kojagiri Purnima 2021: रात्रीचं जागरण, मसाला दूध, चंद्र कसं आहे कोजागरीचं या सगळ्याशी नातं?

Kojagiri Purnima 2021 अश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध आणि जागरण करण्याची प्रथा कशी पडली? काय आहे त्यामागचं खरं लॉजिक?

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई , 19 ऑक्टोबर : आश्विन पौर्णिमेला (Kojagiri Purnima 2021) कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणतात. मंगळवार दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असतं. शरद ऋतूची किंचित गारवा असलेली रात्र असते. आकाश मोकळे होऊन चंद्राचे पिठूर चांदणं पडतं. आणि या प्रकाशात मन प्रसन्न करणारा येणाऱ्या सणासुदीच्या आनंदाची चाहूल देणारा चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण. पण या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध पिणं आणि जागरण करणं यामागे काय आहे शास्त्र? आरोग्यपूरक प्रथा कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप मोठे स्थान आहे. आणि कोजागिरी पौर्णिमेला जागरण करणे हे या दिवसासाठी खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी केशरी मसाला दूध, पोहे, नारळपाणी देण्याची पद्धत आहे. या प्रथेमागे आरोग्यरक्षणाची संकल्पना आहे. शरद ऋतूमध्ये अशा पदार्थांची शरीराला गरज असते. म्हणूनच ही प्रथा आरोग्यास उपयुक्त असते. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण (Damodar Krishnaji Soman) यांनी दिली.

    साप्ताहिक राशिभविष्य : कोजागिरी पौर्णिमेपासून सप्ताहाची सुरुवात; कुणासाठी ठरणार शुभ?

    सोमण यांनी शरद पौर्णिमेबद्दल एक फेसबुक पोस्ट लिहून सविस्तर माहिती दिली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते.

    Explained: जुन्या मौल्यवान वारसा असलेल्या वस्तू त्या-त्या देशाला कशा परत केल्या जातात? काय आहे प्रक्रिया? वाचा

    या दिवसाला देवी ‘को जागर्ति ‘ असं विचारते, असं मानतात. या दिवशी देवी कोण जागा आहे, असे देवी विचारते आणि नकळत त्या जागृत आहे त्याच्यावर देवी प्रसन्न होते. ‘को गर्ति ’ याचा अर्थ केवळ कोण जागरण करत आहे असा नसून तर शरीराची, घराची आणि परिसराची स्वचछता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागरुक आहे, असा आहे. लक्ष्मी देवी आपल्या समाधानाची देवता आहे. त्यामुळे तिला खूश ठेवण्यासाठी आधी आरोग्याकडे, मानसिक प्रसन्नतेकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात