मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

साप्ताहिक राशिभविष्य : कोजागिरी पौर्णिमेपासून सप्ताहाची सुरुवात; कुणासाठी ठरणार शुभ?

साप्ताहिक राशिभविष्य : कोजागिरी पौर्णिमेपासून सप्ताहाची सुरुवात; कुणासाठी ठरणार शुभ?

Weekly horoscope : या सप्ताहात आठवड्याच्या पूर्वार्धात अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे.

Weekly horoscope : या सप्ताहात आठवड्याच्या पूर्वार्धात अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे.

Weekly horoscope : या सप्ताहात आठवड्याच्या पूर्वार्धात अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे.

आज रविवार अश्विन शुद्ध द्वादशी दिनांक 17 ऑक्टोबर 2021. या सप्ताहात आठवड्याच्या पूर्वार्धात अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे तो म्हणजे  सूर्य राशी परिवर्तन.सूर्य कन्या राशीतून आपल्या नीच राशी तुला मध्ये प्रवेश करणार आहे. दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी एक वाजून अकरा मिनिटांनी  सूर्य तुला या शुक्राच्या राशीत प्रवेश करेल. या आठवड्यात गुरू मकर राशीत मार्गी होणार असून मंगळ  कन्या राशीतून तुला राशीत दिनांक 22 ऑक्टोबर रोजी प्रवेश करेल. बुध स्व राशीत कन्येचा, तर राहू वृषभ राशीत असणार आहे. शनी मकर  राशीत मार्गी अवस्थेत असून केतू वृश्चिक राशीत शुक्रा सोबत असणार आहे. सप्ताहाची सुरवात ही  अत्यंत शुभ अश्या कोजागिरी पौर्णिमे पासून होणार आहे. चंद्रबळ कमी असणार्‍या व्यक्तीनी या दिवशी शुचिर्भूत होवून  चंद्राचे दान करावे .पाहूया या सर्व राशींचे आठवड्याचे भविष्य . मेष राशीच्या सप्तमात येणारा सूर्य  जोडीदाराला काही अडचण निर्माण करणार नाही ना इकडे लक्ष असू द्या. पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर काही दान करणे योग्य राहील. राशीतील चंद्र  वैवाहिक जीवनात गोडी वाढवेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील  अष्टमात असलेले ग्रह पायांची काळजी घ्या असे सुचवीत आहे. तसेच परदेशी जाण्याची संधी मिळवुन देणारे आहेत. गुरु कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. खर्चावर नियंत्रण असावे.सप्ताहात मंगळ सूर्य एकत्र येत आहेत. संताप आवरा. आगीच्या घटनां पासून जपा. सप्ताहात अनुकूल आहे. वृषभ षष्ठ स्थानात प्रवेश करणार  मंगल आणि सुर्य शत्रूवर विजय मिळवून देतील .प्रकृती मात्र जपा. उष्णतेचे विकार, रक्तदाब असलेल्या व्यक्तीनी जपून राहावे. शुक्र जोडीदाराला अनुकूल फळ देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल घर आणि व्यवसाय दोन्ही साठी अनुकूल काळ आहे. भाग्यात मार्गी गुरू अडचणी दूर करण्यास मदत करेल. पौर्णिमा खर्चाची ठरू शकते. मिथुन राशीच्या पंचमात येणारा रवि मंगळ योग संतती सोबत संबंध बिघडण्याची शक्यता दाखवतात. पोटाचे विकार असतील तर जपा. शुक्र  षष्ठ स्थानात अधिकाऱ्यांशी चर्चा किंवा गाठभेट करून देईल. शत्रू पराजित होतील. मधुमेही व्यक्तीनी काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार होऊ शकतात. संतती चिंता सतावू शकते आईचे आरोग्य ठीक राहील .आर्थिक बाजु चांगली. पौर्णिमा सामाजिक जबाबदाऱ्या मध्ये उत्तम कामगिरी करून नाव मिळवून देणारी ठरेल. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात येणारे रवि मंगळ वास्तु संबंधी काही  घडामोडी करतील. रक्तदाब असणार्‍यांनी काळजी घ्यावी. . मुलांची प्रगती उत्तम राहील. पौर्णिमा मौजमजेसाठी खर्च, तसेच घरातील वातावरण आनंदी करण्यासाठी उत्तम. गुरु शनि जोडीदाराला शुभ फळ देणारा ठरेल. सप्ताहात सुरवातीला प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. लाभ घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. सप्ताह अनुकूल. सिंह तृतीय स्थानात प्रवेश करणारा सूर्य तुम्हाला तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करण्यास मदत करील. पराक्रम वाढेल. बहिण भावंडाच्या  मदतीची गरज लागेल. कानाची दुखणी त्रास देतील. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा आठवडा. पौर्णिमा शुभ योगाची आहे. आर्थिक  अणि बौद्धिक पातळीवर तुम्ही अग्रेसर राहाल. कन्या राशीतून बाहेर पडणारा मंगळ तुम्हाला  प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी पासून सुटका देईल. मन शांत वाटेल. आर्थिक स्थिती बरी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. रवि मंगळ वाणी स्थानात येत आहेत. बोलताना जरा जपून शब्द वापरा. कटू वचन  बोलू नका. डोळ्याची काळजी घ्यावी लागेल. संतती चिंता कमी होईल. ईश्वरी कृपा राहील. पौर्णिमेला जरा जपून राहण्याचा संकेत आहे . तुला राशीत प्रवेश करणार मंगळ अणि सूर्य जपून राहण्याचे संकेत देत आहेत. कायदेशीर बाबी, आरोग्य विषयक तक्रारी  त्रास देऊ शकतात. प्रॉपर्टी संबंधी वाद निर्माण होतील. जोडीदारा शी  मतभेद वाढू देऊ नका. कोणालाही कठोर बोलू नका. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. तुमचे मनोबल मात्र वाढेल. आर्थिक स्थिती  उत्तम राहील. व्यवसाय धंद्यात जपून रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. पौर्णिमा लाभदायक. वृश्चिक राशीतील  शुक्र तुम्हाला आनंदी  रसिक व्यक्तिमत्त्व बहाल करण्यास तत्पर आहे  खर्चिक, चैनी कडे कल होईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. गुरूची उपासना करावी.  व्यय स्थानात मंगळ सूर्य जपून राहण्याचे संकेत देत आहे.प्रवासाचे योग येतील. तुमच्या बुद्धी चा वापर केला जाईल. पौर्णिमा शुभ योगाची. धनु धनस्थानात शनि गुरू मार्गी होत आहेत .अडकलेले धन मिळू शकते. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. संतती सुख उत्तम. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर राहणार आहे. बुध स्व राशीत उत्तम निर्णय घ्याल  .लाभाची नवीन दालने उघडतील. पुढील दिवसाचे नियोजन नीट करा. व्यय स्थानात शुक्र चैनीची आवड निर्माण करेल. परदेश प्रवास संबंधी काही निर्णय होतील. पौर्णिमा लाभदायक. मकर राशीतील गुरू मार्गी होऊन पुढील राशीत जाण्यास तयार आहे. खोळंबलेली कामे होतील. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पोर्णिमा गृहसौख्य मिळवुन देणारी ठरेल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देणारा काळ आहे. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल  संतती चिंता कमी होईल. ईश्वरी कृपा राहील. कुंभ स्थानबदल,प्रवास, भटकंती असे योग आहेत. भाग्यात येणारा रवि मंगळ योग तीव्र धर्म निष्ठा देईल. अकस्मात प्रवास, मौजमजेसाठी खर्च कराल. एकूण सप्ताहात सुरवातीला प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. पौर्णिमा  भाग्योदय घडवून आणणारी आहे. गृहसौख्य चांगले लाभेल. मातृ पक्ष मदत करेल. सप्ताहात अनुकूल घटना घडतील. मीन राशीच्या अष्टमात येणारे रवि मंगळ  सावधगिरीचा इशारा देत आहेत. प्रवास योग येतील. पण जपून. वाहन चालवा. एकट्याने प्रवास करणे टाळा. प्रकृती जपा. काहींना अचानक आर्थिक नुकसान संभवते. एकुण सप्ताह मिश्र फळ देणारा ठरेल .व्यवसाय उत्तम राहील  .चंद्राचे दान करणे फायद्याचे .पौर्णिमा आर्थिक लाभ मिळवुन देणारी ठरेल. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या