जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Superfood : वरण-भाताला का म्हटलं जातं परिपूर्ण आहार? काय आहेत फायदे?

Superfood : वरण-भाताला का म्हटलं जातं परिपूर्ण आहार? काय आहेत फायदे?

Superfood : वरण-भाताला का म्हटलं जातं परिपूर्ण आहार? काय आहेत फायदे?

डाळ-भाताला परिपूर्ण आहार म्हटले जाते. यातून शरीराला अनेक आवश्यक आणि पौष्टिक तत्त्वे मिळतात. जाणून घेऊया डाळ-भात खाण्याचे काय आहेत फायदे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून : डाळ-भात (Dal-Bhat) आवडत नाहीत असे फार कमी लोक असतील. बहुतेक घरांमध्ये जेवणासोबत डाळ-भात (Dal-Rice) बनवला जातो. या कॉम्बिनेशन फूडमध्ये (Dal-Bhat Combination) मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. त्यामुळे ते शरीरासाठी पौष्टिक (Dal-Bhat Nutritious) देखील असते. परंतु रात्री डाळ आणि भात खाणे योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेषत: ज्यांना वजन कमी (Health Tips) करणारे लोक रात्री दाळ-भात खावा की नाही याचा विचार करतात. तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर हे लक्षात घ्या की रात्रीच्या जेवणात डाळ आणि भात वजन कमी करण्यासाठी योग्य (Right Food For Dinner) आहार ठरू शकतो. आठवड्यातून 4 दिवस खाऊ शकता डाळ-भात वजन कमी करणारे लोक अनेकदा कार्बोहायड्रेट असलेले अन्न सोडतात. परंतु असे केल्याने तुमची ऊर्जा कमी होऊ शकते. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. जर तुमचे वजन कमी करत असाल तर तुम्ही आठवड्यातून 4 दिवस रात्री दाळ-भात खाऊ शकता. आयुर्वेदानुसार रात्री हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. रात्री तूर डाळ खाल्ल्याने पचनक्रियेत समस्या निर्माण होतात असेही सांगितले जाते. हे टाळण्यासाठी डाळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास भिजत ठेवा. याशिवाय डाळ शिजवताना त्यात हिंग टाकल्यास ती पचायला सोपी जाते. पोटात गॅसची समस्या असल्यास रात्रीच्या जेवणात डाळ खाणे टाळावे. मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा पोषक तत्त्वांनी भरपूर असते डाळ डाळीमध्ये शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि फायबर्स असतात. भारतात तुम्हाला अनेक प्रकारच्या डाळी मिळतील. रात्री भात खायचा नसेल तर तुम्ही डाळीचे सांबारही बनवू शकता. त्यात विविध प्रकारच्या भाज्या घातल्याने त्याची पौष्टिकता वाढते. डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या भातामुळे मिळते परिपूर्ण पोषण कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स व्यतिरिक्त भातात शरीरासाठी आवश्यक असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. भातामध्ये चपातीपेक्षा कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे ते पचायला सोपे जाते. त्यामुळे फक्त डाळ आणि भात खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर पोषण मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात