जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / खाज आलेल्या ठिकाणी खाजवल्याशिवाय चैन का पडत नाही? यामागेही आहे शास्त्रीय कारण

खाज आलेल्या ठिकाणी खाजवल्याशिवाय चैन का पडत नाही? यामागेही आहे शास्त्रीय कारण

खाज आलेल्या ठिकाणी खाजवल्याशिवाय चैन का पडत नाही? यामागेही आहे शास्त्रीय कारण

अंगाला खाज आल्यावर जोपर्यंत खाजवत नाही तोपर्यंत अगदी अस्वस्थ असते. खाजवल्यावरच अगदी बरं वाटतं, असं का होतं? याचा विचार कधी केला आहे? यामागचं शास्त्रीय कारण जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 13 मार्च: थंडीच्या दिवसांत अनेक जण अंगाला सतत खाज सुटत असल्याची तक्रार करतात. उन्हाळ्यातही प्रचंड ऊन आणि घामामुळे ही समस्या उद्भवते. काही जणांना ही खाज इतकी असह्य होते की ते सतत हाताने किंवा एखाद्या कंगव्याने अंग खाजवत असल्याचं दिसतं. पाठीला खाज येत असेल तर अगदी अस्वस्थ व्हायला होतं. अशा वेळी वापरण्यासाठी लांबलचक खास हाताच्या रचनेचं डिझाइन असलेली साधनं आता आली आहेत. त्याने अगदी सहजपणे पाठ खाजवता येते. काही वेळा सार्वजनिक ठिकाणी असताना अंगाला खाज आली तर अगदी अवघड स्थिती होते. अशी कशी खाज येते ही, असं वाटतं. अंगाला खाज आल्यावर जोपर्यंत खाजवत नाही तोपर्यंत अगदी अस्वस्थ असते. खाजवल्यावरच अगदी बरं वाटतं, असं का होतं? याचा विचार कधी केला आहे? यामागचं शास्त्रीय कारण जाणून घेऊ या. माणसाला खाज का येते आणि खाजवल्यावरच त्याला बरं का वाटतं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, जगभरात आतापर्यंत अनेक संशोधनं झाली आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं संशोधन म्हणजे मानवाच्या कार्यात्मक चुंबकीय अनुनादाचं परीक्षण (fMRI). खाजवताना मेंदूत होणारे बदल याद्वारे जाणून घेण्यात आले. हे वाचा- हे व्यायाम प्रकार केल्यानं वाढू शकतं आयुष्य! इतका वेळ केल्यानंतर दिसतो परिणाम एखादी व्यक्ती जेव्हा खाज आलेल्या ठिकाणी खाजवण्यास सुरुवात करते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये काही प्रक्रिया घडण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेच्या परिणामस्वरूप त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या बरं वाटू लागतं. आनंद होतो. त्यामुळे ती व्यक्ती वारंवार खाजवण्याची कृती करत राहते, अशी माहिती सायन्स फोकसच्या (Science Focus) अहवालात देण्यात आली आहे. हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला खाज सुटते तेव्हा शरीरात काही रसायनं स्रवत असतात. त्यामुळे मज्जातंतूंद्वारे (Nerve System) ही गोष्ट मेंदूपर्यंत (Brain) पोहोचवली जाते आणि ती व्यक्ती खाजवण्याची कृती पुन्हा पुन्हा करू लागते. हे वाचा- कच्चं आलं खाण्याचे इतके आहेत फायदे; BP, पोटाशी संबंधित आजारांवरही गुणकारी सतत खाज सुटण्याचं सर्वांत सामान्य कारण म्हणजे कोरडी त्वचा (Dry Skin). वारंवार खाज आल्यानं त्वचेला जखमाही होऊ शकतात. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ न देणं महत्त्वाचं आहे. यासाठी त्वचा मऊ ठेवणं आवश्यक आहे. याकरिता मॉश्‍चराइजिंग क्रीमचा वापर करता येतो. अनेकदा त्वचेचे अन्य काही आजार असतील तरीदेखील खूप खाज येत असते. अशा वेळी वारंवार त्या ठिकाणी हात लावणं, खाजवणं टाळलं पाहिजे. खाजवण्यामुळे आनंद मिळतो, हे खरं असलं तरीही सतत त्वचा खाजवण्याने त्रास होतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे खाज येणं आणि खाजवल्यावर आनंद होणं हे फक्त माणसांमध्येच घडतं असं नाही, तर प्राण्यांनाही खाज येते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण मासेदेखील अंग खाजवतात. त्याचा संबंध हॉर्मोन्सशी कितपत आहे, हे अद्याप स्पष्टपणे समोर आलेलं नाही; मात्र याचा संबंध मेंदूशी आहे, हे संशोधनात सिद्ध झालं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात