नवी दिल्ली, 13 मार्च : बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा आणि व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव आदी कारणांमुळे आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसत आहेत. अनेकांना कमी वयातच ब्लड प्रेशर (Blood Pressure) आणि डायबेटिस (Diabetes) यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे; मात्र आपल्या रोज आहारातले काही पदार्थ हे काही आजारांवर गुणकारी ठरतात. आलं अर्थात अद्रक हा पदार्थ त्यापैकीच एक होय. कच्चं आलं (Raw Ginger) अनेक आजारांवर गुणकारी आहे. ब्लड प्रेशर, पोटाशी संबंधित आजार किंवा मायग्रेनची समस्या असेल, तर कच्चं आलं खाणं फायदेशीर ठरतं. या व्यतिरिक्त पुरुषांच्या आरोग्यासाठी आलं विशेष लाभदायी आहे. ब्लडप्रेशर, लैंगिक समस्या असलेल्या पुरुषांनी कच्चं आलं खाणं फायदेशीर मानलं जातं. याबाबतची माहिती झी न्यूज हिंदी ने प्रसिद्ध केली आहे. भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. आपल्या रोजच्या आहारातला प्रत्येक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या आहारात आल्याचा समावेश असेल, तर तुम्ही अनेक आजार दूर ठेवू शकता. ब्लड प्रेशर, पोटाचे विकार, मायग्रेनचा (Migraine) त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कच्चं आलं खाणं आवश्यक आहे. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कच्च्या आल्यात व्हिटॅमिन ए, डी, लोह, झिंक, आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं. तसंच कच्चं आलं सेवन केल्यास सर्दी-खोकल्यासारखे संसर्गजन्य आजारही दूर ठेवता येतात. पुरुषांनी आरोग्यासाठी कच्चं आलं खाणं हितावह आहे. कारण कच्चं आलं खाल्ल्यानं अनेक आजार बरे होतात. हे वाचा - रात्री झोपेत तुमचंही तोंड कोरडं पडतं का? या गोष्टी वेळेवर करायला विसरू नका पुरुषांना लैंगिक समस्या असतील, तर त्यांनी कच्चं आलं खावं. यामुळे अशा समस्या दूर होण्यास मदत होते. कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कमी करण्यासाठी आल्याचं सेवन महत्त्वपूर्ण ठरतं. तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर त्यावर कच्चं आलं गुणकारी आहे. आल्याच्या सेवनानं कोलेस्ट्रेरॉलची पातळी कमी होते. तसंच हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी कच्चं आलं खाणं फायदेशीर आहे. हे वाचा - लग्नानंतर पुरुष वा महिलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय पोटासाठी आल्याचं सेवन उपयुक्त ठरतं. कच्चं आलं खाल्ल्यानं पचनक्रिया मजबूत होते. एखाद्या व्यक्तीला पोटदुखी (Abdominal pain) किंवा पोटातल्या स्नायूंना वेदना होण्यासारख्या तक्रारी असतील, तर त्यानं कच्चं आलं अवश्य खावं. पोटदुखीवर कच्चं आलं खाणं हा उत्तम उपाय ठरतो. मायग्रेन अर्थात अर्धशिशीच्या वेदना कमी करण्यासाठीही कच्चं आलं खाऊ शकता. रोज कच्चं आलं खाल्ल्यास मायग्रेनच्या वेदना आणि थकवा दूर होण्यास मदत होते. याशिवाय कच्चं आलं खाण्याचे आणखीही खूप फायदे आहेत. यामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.