मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair color | आपल्या केसांचे रंग वेगवेगळे का असतात? संशोधनात धक्कादायक गोष्टी समोर

Hair color | आपल्या केसांचे रंग वेगवेगळे का असतात? संशोधनात धक्कादायक गोष्टी समोर

तुमच्या आसपास विविध रंगाचे केस (Hair color) असलेली लोकं तुम्ही पाहिली असतील. मात्र, केसांचे रंग वेगवगळे का असतात? याचा कधी विचार केला आहे का? ब्रिटनमध्ये या संदर्भात एक संशोधन झाले असून यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

तुमच्या आसपास विविध रंगाचे केस (Hair color) असलेली लोकं तुम्ही पाहिली असतील. मात्र, केसांचे रंग वेगवगळे का असतात? याचा कधी विचार केला आहे का? ब्रिटनमध्ये या संदर्भात एक संशोधन झाले असून यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

तुमच्या आसपास विविध रंगाचे केस (Hair color) असलेली लोकं तुम्ही पाहिली असतील. मात्र, केसांचे रंग वेगवगळे का असतात? याचा कधी विचार केला आहे का? ब्रिटनमध्ये या संदर्भात एक संशोधन झाले असून यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 24 नोव्हेंबर: कोणत्याही व्यक्तीकडे पाहताना साधारणपणे पहिल्यांदा लक्ष त्याच्या डोक्याकडे म्हणजेच पर्यायाने केसांकडे (Hair) जाते. एखाद्या व्यक्तीचे वर्णन करतानाही केस फार महत्वाचे असतात. स्त्री सौंदर्यात तर केसांना अनन्य साधारण महत्व आहे. जगभरात पांढऱ्या रंगापासून सोनेरी रंगापर्यंत विविध रंगाचे केस (Hair color) असलेली माणसं पहायला मिळतात. मात्र, या विविध रंगाच्या केसांमागचं कारण माहिती आहे का? आपल्या केसांचे रंग वेगवेगळे का असतात, याचा खुलासा आता संशोधनातून समोर आला आहे.

मेलेनिन (Melanin) हे केसांच्या वेगवेगळ्या रंगांसाठी जबाबदार असलेला महत्वाचा घटक आहे. हे आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या रंगासाठी देखील जबाबदार आहे. हे गुण आपल्या पालकांकडून आपल्याला गुंतागुंतीच्या मार्गाने मिळतात.

केसांच्या रंगामध्ये डझनभर जीन्स कारणीभूत

आपल्या अनुवांशिक माहितीच्या आधारे केसांच्या रंगाचे वेगवेगळे टोन कसे तयार होतात, हे समजून घेणे म्हणजे खूप दिवस न विंचरलेल्या केसांचा गुंता सोडवण्याइतकं कठीण आहे. जरी काही जीन्स (genes) केसांच्या रंगाची भिन्नता निर्धारित करण्यासाठी ओळखली जातात, तरीही युनायटेड किंगडम आणि लॅटिन अमेरिकेतील लोकांच्या मोठ्या समूहावर आधारित अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की केसांच्या रंगामध्ये डझनभर जीन्स (genes) कार्यरत आहेत.

 मेलॅनिन महत्वाच घटक

कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये, काही अभ्यासकांनी कॅनडाच्या युरोपीय वंशाच्या जवळपास 13,000 व्यक्तींच्या केसांच्या रंगात गुंतलेल्या जनुकांचा अभ्यास केला. यात जेनेटीक व्हेरिएंट्समुळे (genetic variants) देखील केसांच्या रंगात फरक येऊ शकतो, असा निष्कर्ष आला आहे. मेलॅनिन त्वचे, डोळे आणि केसांच्या फॉलिकल्समध्ये (follicles) आढळणाऱ्या मेलानोसाइट्स नावाच्या विशिष्ट पेशी प्रकारात तयार होते. मेलॅनिन मेंदूमध्ये देखील आढळते. मेलेनिनचा प्रकार, प्रमाण आणि ते पेशींमध्ये कसे वितरित केले जाते, यावरुन केस, त्वचा आणि डोळ्यांच्या रंगात फरक निर्माण होतो.

मेलेनोमा हा त्वचेच्या कँसरचाही एक प्रकार असून त्वचेमध्ये मेलेनोसाइट्सची अनावश्यक वाढ झाल्यानंतर तो होतो.

कोणत्या रंगद्रव्यामुळे लाल, काळे आणि सोनेरी केस येतात?

आपल्या केसांमध्ये मेलेनिनचे दोन मुख्य प्रकार आहेत: युमेलॅनिन (eumelanin) आणि फेओमेलॅनिन (pheomelanin). युमेलॅनिनला तपकिरी-काळा रंगद्रव्य म्हणूनही ओळखले जाते, तर फेओमेलॅनिनला लाल-नारिंगी रंगद्रव्य म्हणून ओळखले जाते. लाल केस असलेल्या लोकांमध्ये फिओमेलॅनिन जास्त असते, काळे केस असलेल्या लोकांमध्ये फेओमेलॅनिनपेक्षा युमेलॅनिनचे प्रमाण जास्त असते आणि सोनेरी केस दोन्ही रंगद्रव्यांच्या कमी प्रमाण असल्याने येतात.

केस फार पांढरे झालेत? तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल समस्येपासून मुक्ती

मेलॅनिनच्या दोन प्रकारांपैकी कोणते संश्लेषित केले जाते याचे मार्गदर्शन करणारा मुख्य फरक म्हणजे मेलानोसाइट-उत्तेजक संप्रेरक रिसेप्टर (melanocyte-stimulating hormone receptor) किंवा MC1R. MC1R जनुकाच्या प्रकारामुळे प्रथिनांचे कार्य बिघडल्याने याचा परिणाम फिओमेलॅनिनच्या उत्पादनावर होऊ शकतो. याउलट, आपल्या जीनोममध्ये अनेक जीन्स आहेत, ज्यात युमेलॅनिन व्हेरीएशन समाविष्ट आहे, यात MC1R जनुकातील कमी हानीकारक जनुकीय प्रकारांचा समावेश आहे.

अभ्यासातून काय समोर आलं?

या अभ्यासात ऑटोसोमल गुणसूत्रांमध्ये केसांच्या रंगाशी संबंधित जेनेटीक रिजन (genetic regions) ओळखण्यासाठी जीनोम-वाइड असोसिएशन स्टडीज (GWAS, pronounced ghee-was) वापरण्यात आले. GWAS ने इतर कार्यात्मक जीनोमिक घटकांमध्ये ओव्हरलॅपिंग असोसिएशन ओळखले. ही पद्धत आंतरजेनिक (intergenic) क्षेत्रांमधील संघटना, जीन्स दरम्यान स्थित डीएनए अनुक्रम देखील ओळखते.

काळ्या मिरीचा हा उपयोग माहिती झाला की, हेअर डाय वापरणं सोडून द्याल

केसांचा रंग ठरवणार्‍या अनुवांशिक घटकांचा अभ्यास करून, पिगमेंटेशन कसे होते याबद्दल आपण माहिती मिळवू शकतो. हे आपल्याला पिगमेंटेशन रोग आणि त्यांचे अनुवांशिक जोखीम घटक समजून घेण्यास मदत करते, जसे की त्वचेच्या मेलेनोमा आणि त्वचारोगात रंगद्रव्याची भूमिका.

आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे डीएनए स्त्रोताकडून केसांच्या रंगाचे अंदाज मॉडेल तयार करता येऊ शकते. ज्यामध्ये पोलिस तपासात फॉरेन्सिक डीएनए फेनोटाइपिंगचा वापर आहे, ज्यात फॉरेन्सिक नमुन्यांवरून व्यक्तीच्या दिसण्याचा अंदाज लावता येतो. केसांच्या रंगाच्या संशोधनात इतर लोकसंख्येच्या गटांचा समावेश केल्याने नवीन जीन्स ओळखण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे पिगमेंटेशन यंत्रणेची आपली समज आणखी सुधारू शकते.

First published:

Tags: Woman hair, Women hairstyles