नवी दिल्ली, 22 मे : राष्ट्रपिता महात्मा गांधी कधीच चहा पीत नसत. ते चहापासून कायम दूर राहत असत. चहापान चांगलं नाही, असा सल्ला ते सर्वांना द्यायचे. ब्रिटिश राजवटीत जेव्हा ब्रिटिश अधिकारी आणि व्यापारी चहाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले तेव्हा गांधीजींनी त्याविरुद्ध मोहीम सुरू केली होती. काही वर्षांपूर्वी गांधीजींच्या आहारावर एक-दोन पुस्तकं लिहिली गेली होती, त्यात याचा उल्लेख होता. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी गांधीजींच्या आहाराविषयी संशोधन प्रकाशित केले. अमेरिकेतल्या कार्नेगी मेलॉन विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक निको स्लेट यांनी `गांधीजीज सर्च फॉर दी परफेक्ट डाएट - इटिंग विथ द वर्ल्ड` हे पुस्तक लिहिलं आहे. याशिवाय याच विषयावर गांधी अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ मार्क लिंडले यांचं गांधी ऑन हेल्थ` हे पुस्तक 2018मध्ये` प्रकाशित झालं. देशातलं सर्वांत लोकप्रिय पेय असलेल्या चहापासून महात्मा गांधी दूर राहत असत, असं या पुस्तकांमध्ये म्हटलं आहे. आपल्या देशात चहाची क्रेझ इतकी आहे, की त्याला राष्ट्रीय पेय देखील म्हणता येईल; पण ब्रिटिशांनी चहा जेव्हा भारतात आणला त्या वेळी त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं. इंग्रजांनी चहाला प्रोत्साहन देण्यासाठी केला कायदा 19व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणामुळे, 2006पर्यंत भारत जगातला सर्वांत मोठा चहा उत्पादक राहिला. चीनप्रमाणे भारताच्या बहुतांश भागात चहा पिण्याची कोणतीही प्राचीन परंपरा नव्हती. यानंतर 1903मध्ये लॉर्ड कर्झनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारने चहावरचा कर कमी आणि विक्री वाढण्यासाठी कायदा बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. राष्ट्रवादी विचारसरणीच्या व्यक्तींना आवडत नसे चहा त्या काळात देशातल्या बहुतेकशा चहाच्या बागा ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या ताब्यात होत्या. हे व्यापारी चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांचं शोषण करत. त्यामुळे बहुतांश राष्ट्रभक्त नेते चहाला विरोध करायचे. शरदचंद्र यांच्या कांदबरीतल्या अनेक पात्रांना चहा प्यायला आवडत नसे आणि हे तरुण स्वातंत्रलढ्यात सहभागी असायचे. Wardha News: महात्मा गांधींचा वारसा जपणारं सेवाग्राम, पाहा कसं बनवतात कापसापासून कापड, Video चहा विष असल्याचं गांधीजी सांगत 1920च्या सुरुवातीस, प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आणि राष्ट्रभक्त आचार्य प्रफुल्ल रे यांनी चहाची तुलना विषाशी करणारी व्यंगचित्रं प्रकाशित केली. महात्मा गांधींनी त्यांच्या `ए की टू हेल्थ` या पुस्तकातल्या एका प्रकरणात चहाचं विष म्हणून वर्णन केलं आहे. चहाला तुरटपणाची चव देणारं टॅनिन नावाचं संयुग मानवी आरोग्यासाठी वाईट आहे, असं गांधीजींनी लिहिलं आहे. गांधीजींनी तंबाखू आणि कोकोसोबत चहाची तुलना केली आणि त्याला एक अंमली पदार्थ असं म्हटलं आहे. आपल्या आंदोलनावेळी ते लोकांना चहा पिण्यापासून परावृत्त करत असत. त्या काळी चहा लोकप्रिय व्हावा यासाठी इंग्रज भारतीयांना चहा मोफत देत होते. वृत्तपत्रापासून रेल्वे स्थानकांपर्यंत चहाच्या सचित्र जाहिराती असायच्या. चहा हा भारतीय जीवनाचा एक भाग बनला आहे, असं या जाहिरातींमधून सांगितलं जायचं. चहा आरोग्यासाठी चांगला आहे, असं सांगितलं जात होतं. स्वातंत्र्यापूर्वी ब्रूक बाँडच्या गाड्या शहरात फिरत होत्या. दूध घेऊन येणाऱ्यास मोफत चहा दिला जात असे. ही गाडी चहा उकळून देत असे. असं असूनही 1940च्या दशकात भारतीय चहाची बाजारपेठ तुलनेने छोटी राहिली. 1960मध्ये सर्वांत मोठा टर्निंग पॉइंट आला. या काळात कामगार वर्ग मोठ्या संख्येने चहाकडे वळला. गांधीजी स्वातंत्र्य चळवळीत आणि खासगी आयुष्यात क्वचितच चहा प्यायले असतील. व्हाइसरॉय किंवा ब्रिटिश राजवटीच्या अधिकाऱ्यांच्या भेटीत जेव्हा जेव्हा दिला जायचा तेव्हा ते त्यास नकार देऊन फक्त पाणी प्यायचे. शेळीचं दूध आणि गरम पाण्यात लिंबू पिळून पिणं ते आरोग्यासाठी उत्तम आणि योग्य मानायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वाधिक चहाच्या बागा पश्चिम बंगालमध्ये होत्या. पश्चिम बंगालमधला उच्चभ्रू वर्ग भरपूर चहा प्यायचा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे, की ते चहाचे खूप शौकीन होते आणि ते अनेक कप चहा प्यायचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.