मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'या'आजारामुळे गणितात कमकुवत असतात मुलं, याचं कारण आणि उपचार जाणून घ्या

'या'आजारामुळे गणितात कमकुवत असतात मुलं, याचं कारण आणि उपचार जाणून घ्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काही मुले अभ्यासात लक्ष देऊनही वाचनात फारच कमकुवत असतात. खासकरुन काही लहान मुलं, ज्यांना गणित कळत नाही ते गणितात खूप मागे राहाता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 27 सप्टेबर : बरेच लोक अभ्यासात कमकुवत असतात, त्यामागची त्यांची वेगवेगळी कारण असतात. काही लोकांना अभ्यास करायचाच कंटाळा येतो, ज्यामुळे ते जास्त मेहनत घेत नाही. परंतू तसे पाहाता अभ्यासाचा आणि करिअरचा तसा संबंध नाही, कारण शाळेत कमी मार्क मिळवून देखील अनेक असे लोक आहेत, ज्यांनी आयुष्यात मोठा टप्पा गाठला आहे.

त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांवर अभ्यास न केल्यामुळे प्रेशर करु नये. काही मुले अभ्यासात लक्ष देऊनही वाचनात फारच कमकुवत असतात. खासकरुन काही लहान मुलं, ज्यांना गणित कळत नाही किंवा गणितात खूप मागे राहाता, या आजाराला मॅथ्स डिस्लेक्सिया असे म्हणतात.

चला या आजाराबद्दल जाणून घेऊया

हे ही वाचा : IAS Officer च्या दहावीची मार्कशिट का होतेय व्हायरल? 'या' गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चा

डिस्लेक्सिया म्हणजे काय?

संशोधनातून असं लक्षात आलं आहे की मॅथ्स डिस्लेक्सियावर ही समस्या अनुवांशिक आहे. याशिवाय, लहान वयात, जेव्हा अनेक मुले त्यांच्या मनात गणित अवघड असल्याचं समजतात आणि त्या भीतीमुळे ते स्वतःला गणिताच्या प्रश्नांपासून दूर ठेवतात. मग ही भीती कोणत्याही रोगासारखी मनात घर करून जाते. ज्यामुळे मुलांना गणिताच्या संकल्पना समजून घेणं अवघड जातं.

त्याची लक्षणे काय आहेत?

मॅथ्स डिस्लेक्सिया असलेल्या लोकांमध्ये असे दिसून येते की ते गुणाकार, वजाबाकी, बेरीज आणि भागाकार सारख्या अनेक लहान गणितं सोडवू शकत नाहीत. याशिवाय या आजाराने त्रस्त झालेले लोक साधी आकडेमोड करताना देखील गोंधळून जातात. यासोबतच त्यांना नंबर ओळखण्यातानाही त्रास होतो.

हे वाचा : वडिलांचे 60 वर्षांपूर्वीचे पासबुक सापडले आणि मुलाचे नशीबच पालटले, काय आहे हे प्रकरण? वाचा

उपचार काय आहे?

मॅथ्स डिस्लेक्सिया हा एक प्रकारचा मेंदूशी निगडीत आजार आहे आणि त्यावर आजपर्यंत कोणतेच अचूक उपचार सांगितले गेलेले नाहीत, पण यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुलांनी गणिताचा नियमित सराव करून या विषयाकडे अधिक लक्ष द्यावे. अशा प्रकारे ते नियंत्रित केले जाऊ शकतं.

मुलांच्या मनातील गणिताची भीती गेली की, ते आपोआपच ठिक होतं, तसेच तुम्ही त्यांना गणित सोडवण्याची सोपी पद्धत सांगून त्यांच्या मनातील भीती घालवू शकता.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

First published:

Tags: Education, Health, Maths, Parents and child, Viral news