मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'बनारसी शालू'चा का आहे एवढा भाव? या कारणामुळे बनारसी साड्यांची किंमत असते लाखोंच्याही घरात

'बनारसी शालू'चा का आहे एवढा भाव? या कारणामुळे बनारसी साड्यांची किंमत असते लाखोंच्याही घरात

बनारसी शालूमध्ये असं असतं काय? कशी विणतात ही बनारसी साडी?

बनारसी शालूमध्ये असं असतं काय? कशी विणतात ही बनारसी साडी?

बनारसी शालूमध्ये असं असतं काय? कशी विणतात ही बनारसी साडी?

वाराणसी, 11 ऑगस्ट: विविध प्रकार आणि वेगवेगळ्या डिझाइनच्या साड्या (designer Saree) महिला वर्गाला नेहमीच भुरळ घालतात. आज बाजारात विविध प्रांतांतल्या अनेक पद्धतीच्या साड्या उपलब्ध आहेत. त्यात बनारसी साड्यांना (Banarasi Saree) महिला वर्गाची विशेष पसंती असते; पण साड्यांचे असेही काही प्रकार असतात, की जे अत्यंत सुंदर कलाकुसर केलेले आणि भलतेच महाग असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच सुंदर, परंतु महाग साडीविषयी सांगणार आहोत. बऱ्याचदा ब्रोकेडचा (Brocade) वापर बनारसी साड्यांमध्ये केला जातो. ब्रोकेडपासून तयार केलेल्या साड्या आणि अन्य आउटफिट्स फार महाग असतात. ब्रोकेडपासून तयार केलेल्या बनारसी साडीची किंमत तर 3 लाखांपर्यंत असू शकते. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) हातमाग कामगारांनी साड्यांवर सोन्याच्या धाग्यांच्या मदतीने अशी काही कलाकुसर केली आहे की ती साडी 3D सारखी दिसत आहे. ही माहिती वाचल्यावर तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. हे ब्रोकेड म्हणजे काय आणि याचा वापर केलेल्या साड्या इतक्या महाग का असतात, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. ब्रोकेड आणि बनारसी साड्यांविषयी सविस्तर माहिती देणारं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

खरं तर, ब्रोकेड म्हणजे असं कापड की ज्यावर सोनं (Gold) किंवा चांदीच्या (Silver) धाग्यांनी भरतकाम केलेलं असतं. या ब्रोकेडचा वापर पूर्वी प्रामुख्याने राजघराण्यातल्या व्यक्तींसाठीच केला जात असे; मात्र आता हे ब्रोकेड तुम्हाला कोठेही उपलब्ध होऊ शकतं. पूर्वी कापडावर आधी डिझाइन केलं जात असे आणि त्यानंतर धाग्यांच्या साह्याने भरतकाम केले जाई. आता ब्रोकेडवर असं डिझाइन केलं जात नाही, तर थेट भरतकाम केलं जातं. पूर्वीच्या काळी ब्रोकेडचं काम सिल्कवर केले जाई. जसजसा काळ बदलला आणि तंत्रज्ञान अधिक प्रगत होत गेलं तसा ब्रोकेडचा वापर लोकर, सुती कापडांवर, तसंच सिथेंटिक फॅब्रिक्सवरही केला जाऊ लागला. ब्रोकेडमध्ये एका वेळी 100 ते 600 धागे वापरले जातात.

उत्तर प्रदेशात पारंपरिक बनारसी साडीवर ब्रोकेडचं काम करणाऱ्या छोट्या उद्योगांचं रूपांतर आता कुटीरोद्योगांमध्ये झाले आहे. सुमारे 12 लाख लोक या उद्योगात आहेत. यामुळे अनेकांना रोजगार (Employment) उपलब्ध झाला आहे. हे लोक या उद्योगाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडले गेले असून, ते आता हॅण्डलूम सिल्क इंडस्ट्रीचा (Handloom Silk Industry) एक भाग झाले आहेत. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी, मिर्जापूर, गोरखपूर, चंदौली, जोनपूर आणि आझमगड या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने बनारसी साडी आणि ब्रोकेडची कामं केली जातात. गेल्या काही वर्षांमध्ये बनारसी साडी आणि ब्रोकेडची कला जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे वाराणसीतले काही ब्रॅण्ड खूप चर्चेत आले. हे ब्रॅण्ड सध्या विणकरांची कला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात.

पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे

इतिहासात ब्रोकेडचा वापर सर्वप्रथम चीनमध्ये (China) करण्यात आल्याचं आढळून येतं. तिथे ख्रिस्तपूर्व 475 ते 221 दरम्यान ब्रोकेडचा वापर होत होता. त्यानंतर ब्रोकेडचा वापर युरोप आणि आशियाई देशांमध्ये सुरू झाला. आता जगात सर्वत्र ब्रोकेडचा वापर होताना दिसतो. बनारसमध्ये तयार होणाऱ्या ब्रोकेड साड्यांमध्ये सिल्कच्या कापडाचा वापर केला जातो. या साड्यांमध्ये जरीचा वापर करून डिझाइन तयार केलेलं असतं. यामुळे या साड्यांचं वजन जास्त असतं. या साड्यांवर प्रामुख्याने मुघल काळातील (Mughal Era) शैलीचं डिझाइन असतं. याशिवाय साड्यांवर सोन्याची कलाकुसर करून त्यावर जाळीसारखा पॅटर्न तयार केला जातो. बनारसमध्ये साड्यांचं काम पारंपरिक पद्धतीने होतं. ते जाला, पगिया आणि नाका या नावांनी ओळखलं जातं.

फक्त ‘हे’ Home Made ज्युस प्या; केस इतके वाढतील की विश्वास बसणार नाही

बनारसी साड्यांमध्ये ब्रोकेड आणि जरीचा वापर 19व्या शतकात सर्वप्रथम केल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळी गुजरातमधले विणकर उपासमारीमुळे बनारस येथे स्थलांतरित झाले होते. 17व्या शतकात येथूनच सिल्क ब्रोकेडचं काम सुरू झाल्याचं सांगितलं जातं. 18 व्या आणि 19 व्या शतकात हे काम अधिक वेगात आणि दर्जेदार होत गेले. मुघल काळात म्हणजेच 14 व्या शतकात ब्रोकेड विणण्यासाठी सोन्या-चांदीच्या धाग्यांना प्राधान्य दिलं जात असे. हळूहळू हे धागे बनारसी सिल्क (Banarasi Silk) आणि बनारसी साड्यांची ओळख बनू लागले. ब्रोकेडमुळे बनारसी साड्यांची किंमत 3 हजार ते 5 लाख रुपयांदरम्यान असते. याशिवाय दक्षिण भारतातल्या कांजीवरम साड्यांमध्येदेखील ब्रोकेडचा वापर होतो. त्या साड्याही महाग असतात.

First published:

Tags: Saree