सुंदर,लांब आणि निरोगी केस प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या केसांचं आरोग्य आपला आहार आणि लाईफस्टाइलवर अवलंबून असतं. या व्यतिरिक्त अनुवांशिक गोष्टीवरही चांगले केसं अवलंबून असतात.
बरीच औषधं,तेल, शॅम्पू वापरुन केसांचं आरोग्यही चांगलं ठेवता येऊ शकतं.पण काही रासायनिक उत्पादनांचा वापराचा केसांच्या गुणवत्तेवर निगेटिव्ह इफेक्ट करतात.
कोरफड त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. हे प्रोटीओलाइटिक एंजाइमनने समृद्ध आहे. ज्यामुळे मृत पेशी आणि केसांच्या त्वचेला मजबूत करतं.
कोरफडचा रस घेतल्याने केसांचं आरोग्य हळूहळू चांगलं होतं आणि वेगाने वाढू लागतात. यासाठी दररोज सकाळी 1 ग्लास एलोवेरा ज्युस प्या. पहा केसांवर चांगला परिणाम होईल.
केळी आणि बदाम दोन्ही केसांसाठी फायदेशीर आहेत. बदामात प्रोटिन, व्हिटॅमीन्स आणि झिंक सारखे खनिज पदार्थ असतात. जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण घटक मानले जातात.
त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई केराटिनची निर्मिती वाढवून खराब झालेल्या केसांच्या दुरुस्तीसाठी खूप उपयुक्त ठरतं. केळ्यांमध्ये कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे केस निरोगी आणि मजबूत बनतात. 1 ग्लास दुधात बदाम,केळी,दालचिनीची पूड आणि मध मिसळा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. रोज ही स्मूदी प्यायला सुरूवात करा.
बार्लीमध्ये आयर्न आणि कॉपर असतं. ज्यामुळे रक्तातल्या लाल रक्तपेशींचं उत्पादन वाढतं. बार्ली म्हणजे जवाच्या पाण्यात मीठ घालून उकळवा. त्यात लिंबू आणि मध मिसळा आणि थंड झाल्यावर प्या.