मुंबई, 17 जुलै : केळं (Banana) हे जगातल्या सर्वांत स्वस्त आणि पौष्टिक फळांपैकी (Fruits) एक आहे. केळीचं झाड भरपूर पाणी असलेल्या कोणत्याही ठिकाणी सहज जगतं. त्याचा ठराविक हंगाम नसल्याने वर्षभर हे फळ उपलब्ध असतं. तसंच स्वस्त असल्यामुळे सर्व आर्थिक स्तरांतल्या व्यक्तींना हे फळ (Banana fruit) खाणं सहज शक्य होतं. केळ्यांमध्ये लोह आणि पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. यामुळे शरीरात रक्त वेगानं तयार होतं आणि अशक्तपणाची तक्रार दूर होते (Benefits of banana). जगात उत्पादित होणाऱ्या केळ्यांपैकी 51 टक्के केळी नाश्त्याच्या (Breakfast) वेळी खाल्ली जातात, असं एक निरीक्षण आहे. असं हे उत्तम फळ (Banana shape) कधीही सरळ असत नाही. केळी कायमच वाकडी (Facts about banana) असतात. केळ्यांचा आकार असा अर्धवर्तुळाकार का असतो? असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल (Know all about banana).
निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक कारण असतं. निसर्गातल्या कोणत्याही सजीव घटकाचं वर्तन हे निसर्ग नियमांना अनुसरूनच असतं. साहजिकच वनस्पतीही त्याला अपवाद नाहीत. केळ्याच्या अर्धवर्तुळाकार आकारालाही एक वैज्ञानिक कारण आहे.
केळ्याच्या प्रजातीचा उगम रेनफॉरेस्ट्स (Rainforests) अर्थात पर्जन्यवनांमध्ये झाला होता, असं वनस्पतीशास्त्रीय इतिहास (Botanical History) सांगतो. ही वनं खूप घनदाट असल्याने त्यांच्या मध्यभागात सूर्यप्रकाश (Sunlight) खूप कमी पोहोचतो. झाडं सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात. त्याला निगेटिव्ह जिओट्रॉपिझम (Negative Geotropism) असं म्हणतात.
हे वाचा - Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी पराठा खावा की चपाती? हा आहे योग्य पर्याय
याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यफूल. सूर्यफुलं फुललेल्या शेतांचं दररोज निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल, की सूर्य उगवताना सूर्यफुलांचं (Sunflower) तोंड पूर्वेला असतं. दुपारी सूर्य माथ्यावर असताना सूर्यफुलं ताठ उभी असतात. तसंच संध्याकाळी सूर्यफुलांचं तोंड पश्चिमेच्या दिशेने गेलेलं दिसतं.
हाच नियम केळ्याच्या झाडालाही लागू होतो. केळ्याच्या किंवा कोणत्याही झाडाला फळं येण्याआधी फुलं येतात. त्याआधी कळ्या येतात आणि कळ्यांची फुलं होतात, हे मूलभूत विज्ञान सर्वांनाच माहिती आहे. केळ्याची फुलं एखाद्या गुच्छासारखी असतात. सुरुवातीला जेव्हा फुलांची फळं होऊ लागतात, तेव्हा ती केळी जमिनीच्या दिशेने वाढतात.
हे वाचा - तुम्ही टिफीनमध्ये नेता उकडलेलं अंड?; किती वेळाने होतं खराब माहिती आहे ना ?
रेनफॉरेस्ट्समध्ये केळ्याचा उगम झाला, तिथे घनदाट झाडीमुळे सूर्यप्रकाश फार कमी प्रमाणात येत असे. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्यप्रकाश दिसे, तेव्हा तेव्हा जमिनीच्या दिशेने वाढत असलेली केळी आकाशातल्या सूर्याच्या दिशेने वाढू लागायची. आधी जमिनीच्या दिशेने सरळ वाढत असलेली केळी वळण घेऊन सूर्याच्या दिशेने वाढू लागल्यामुळे त्यांचा आकार अर्धवर्तुळाकार झाला. त्यांचं हे वर्तन कायम राहिलं आहे. त्यामुळे केळ्यांचा आकार कधीही सरळ नसतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.