दिल्ली,15 जुलै : दररोज 1 अंडं खाणं आरोग्यासाठी (Benefits of Eating Eggs) खूप फायदेशीर मानलं जातं. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,व्हिटॅमीन आणि खनिजे असतात पण, कार्बोहायड्रेट कमी असतात. अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही. शिवाय आपलं आरोग्यही निरोगी (Healthy) राहतं. इम्युनिटी वाढवण्यासाठी अंड खाणं फायदेशीर मानलं जातं. अंड हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये व्हिटॅमीन इ देखील असतं. जिममध्ये वर्कआउट करणारे लोक उकडलेली अंडी खातात. मात्रं उकडलेलं अंडं खाण्याची आवड असणार्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उकडलेलं अंड किती काळ ठेवावं नेहमीच ताजं उकडेलेलं अंड खाणं योग्य मानलं जातं. मात्र उकडलेल्या अंड्याला योग्य प्रकारे स्टोअर केलं तरच ते जास्त काळ टिकू शकतात. अंड फ्रिजमध्ये ठेवण्याबरोबरच आणखीन बरेच्या मार्गांनी जास्त वेळ टिकवता येतं. त्यामुळे अंड्याची चव आणि पोषक घटकही बिघडत नाहीत. ( तरुण नाहीच पण भयानक दिसू लागली; 2 लाखांची क्रीम लावूनही चेहऱ्याची भयंकर अवस्था ) उकडलेलं अंड 5 ते 7 दिवस ठेवलं जाऊ शकतं. पण ते दोन दिवसांच्या आत खायला हवं. उघडताना त्याच्या कवचाला तडा गेला असेल तर असं अंड 2 ते 3 दिवसांच्या आत खावं. अंड जास्त दिवस ठेवल्यास त्याची PH लेव्हल बदलते यामुळे अंड्याला वासही येतो. अंड उकडल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाकावं. थंड झाल्यानंतर कवच न काढता स्वच्छ कपड्याने पुसून फ्रिजमध्ये ठेवावं. यामुळे अंड्यामध्ये बॅस्टेरिया किंवा कोणतेही इन्फेक्शन वाढणार नाही. ( तुमचं वय 40 च्या आत आहे? या सुंदर शहरात स्थायिक होण्यासाठी मिळत आहेत 25 लाख! ) फ्रिज****मध्ये ठेवा उकडल्यानंतर अंड थंड झाल्यानंतर लवकरात लवकर फ्रिजमध्ये ठेवावं. अंड उशीरा खाणार असाल आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर ते आरोग्याला घातक ठरतं. जास्त तापमानामध्ये अंड्यामध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया निर्माण होतो. उकडलेल्या अंड जास्तीत जास्त 2 तास बाहेर ठेवावं. पण खाण्याच्या काही वेळ आधीच बाहेर काढावं. ( डास नेमके मलाच का चावतात? ठराविक व्यक्तींनाच जास्त चावण्यामागे हे आहे विज्ञान ) अंडे खाण्याचे फायदे अंडं प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहे (Egg is Source of Protein).त्यामुळे आरोग्यासाठी फायेदशीर (Beneficial for health) असलेल्या पदार्थांमध्ये अंड्याला महत्व आहे. अंड्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल,फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी5, व्हिटॅमीन बी6, व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन के हे पोषक (Healthy) घटक असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







