नवी दिल्ली,16 जुलै : खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या आवडीनिवडी (Preferences) वेगवेगळ्या असतात. कोणाला भात आवडतो, कोणाला चपाती किंवा भाकरी काहीजण आवडीने पराठे खातात. अर्थातच पराठ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे ते जास्त हेल्दी **(Healthy)असतात. वजन कमी (Weight Loss) करणाऱ्यांसाठी पराठे किंवा चपाती नेमकं काय योग्य आहे हे जाणून घेऊ यात. आपण कोणत्या प्रकारचं डायटिंग (Dieting) करत आहोत यावर आपण चपाती खावी की पराठा हे अवलंबून आहे. हाय कॅलरी डाएट (High Calorie Diet) घेणाऱ्यांनी पराठा मुळीच खाऊ नये शिवाय लो कॅलरी(**Low Calorie Diet) घेणाऱ्यांसाठी चपाती खाणं हानीकारक ठरू शकतं. वजन कमी करण्यांनी अगदी उपाशी राहू नये, नेहमीच बॅलन्स डाएट (Balance Diet) घ्यावा. प्रोटीन, व्हिटॅमीन याबरोबरच कार्बोहायड्रेड किंवा कॅलरीज असणारे पदार्थ घ्यायला हवेत. वजन कमी करताना काय खावं? वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करताना सर्वात अधिक कॅलरीज विचार केला जायला हवा. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज असणारा आहार घ्यावा. चपातीचा विचार करता, साधारण आकाराच्या गव्हाच्या चपातीमध्ये 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट 3 ग्रॅम प्रोटीन आणि 70 कॅलरीज असतात तर, त्याच आकाराच्या पराठ्यामध्ये 126 कॅलरीज असतात. यावरून पराठ्यामध्ये सर्वात जास्त कॅलरीज असतात हे कळतं. ( ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत अनेक फायदे; हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत; पत्नी होईल खूश ) केव्हा खावा पराठा रात्रीच्या जेवणाऐवजी सकाळच्या नाश्त्यामध्ये पराठा खायला हवा. त्यामुळे सकाळच्या धावपळीसाठी ऊर्जा मिळते आणि योग्य पोषण मिळतं. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये चपाती खाणं योग्य आहे. मात्र चपातीबरोबर आपण कोणत्या भाज्या खातो हे देखील महत्त्वाचं असतं. ( ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स नेमका फरक काय? सर्वोत्तम ब्रेकफास्ट कोणता? ) डायबेटिस रुग्णांनी पराठा टाळावा. डायबिटीज पेशंटसाठी तेलकट,तळलेले पदार्थ नुकसानदायक असतात. यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. पराठा बनवताना त्याला जास्त तूप लावलं जातं. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना साधी चपातीच खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पराठा किंवा चपाती हेल्दी बनवायची असेल तर, त्यासाठी बाजरी, ज्वारी, बदाम, ओट्स यांचाही वापर करता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.