मुंबई, 3 मे : यंदा उन्हाळा (Summer Season) जास्तच तापला आहे. उन्हाच्या उष्ण लाटांनी लोकांना हैराण केलं आहे. वाढत्या तापमानामुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. अशा परिस्थितीत केवळ पंख्याने उष्णता दूर होत नाही. त्यामुळे हल्ली लोकांचा कल घरात एअर कंडिशनर बसवून घेण्याकडे (Air Conditioner) वाढला आहे. उन्हाळ्यात अनेकजण कूलरचादेखील वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु, कूलरपेक्षा एअर कंडिशनर जास्त चांगलं काम करतो. कडक उन्हाळ्यात घरातलं किंवा गाडीमधलं वातावरण थंड करून एअर कंडिशनर आपल्याला उन्हापासून वाचवतात. अनेक घरांमध्ये आता कूलरऐवजी एअर कंडिशनर वापरला जातोय कारण या उन्हाळ्यामध्ये कूलर (Cooler) लावल्याने वातावरणातील आर्द्रता वाढते आणि त्यामुळे थंड हवेतदेखील दमटपणा येऊ लागतो. जे आपल्यासाठी थोडे त्रासदायक असते. त्यामुळे लोक सध्या एसीला प्राधान्य देत आहेत. परंतु, हा एसी वापरत असताना त्याच्या टेम्परेचरबद्दलची योग्य माहिती तुम्हाला आहे का? तुम्हीदेखील एसी वापरत असाल किंवा नुकताच एसी घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊया एअर कंडिशनरच्या योग्य तापमानाबद्दल. या बद्दलच सविस्तर वृत्त हर जिंदगी या वेबसाईटने प्रकशित केलं आहे. एअर कंडिशनरचे डिफॉल्ट टेम्परेचर (Default Temperature Of Air Conditioner) 24 डिग्री सेल्सिअस ठेवण्याचा सल्ला भारतीय ऊर्जा मंत्रालयाने दिला होता. मंत्रालयाच्या वतीने असंही सांगण्यात आलं आहे की, ‘एअर कंडिशनरचं डिफॉल्ट टेम्परेचर 24 डिग्री सेल्सिअस ठेवल्यास उर्जेच्या वापरामध्ये बचत होईल. तसंच तुमचं एक वर्षाचं वीज बिल 4000 रुपयांनी कमी होईल. मात्र, जर तुम्हाला खोली जास्त थंड करायची असेल तर तुम्ही ते मॅन्युअली सेट करू शकता. एअर कंडिशनरवर तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवल्यास 6% उर्जेची बचत होते. किमान तापमान 21 अंशांऐवजी 24 अंशांवर सेट केल्यास 18% ऊर्जेची बचत होईल.’
दु:खाच्या प्रसंगी का परिधान केले जातात काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे?
एअर कंडिशनर्समुळे उष्णतेपासून होणाऱ्या त्रासातून आपली सुटका होते. परंतु, काहीवेळा घराबाहेरून आल्यानंतर किंवा खोली थंड करण्यासाठी लोक एसीचे तापमान 18 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमीवर सेट करतात, जे योग्य नाही. उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक घरात घरात एसी लावून घेतात. यावेळी AC इन्स्टॉलर एसी 24°C वर सेट ठेवण्याचा सल्ला देतात. यामुळे ऊर्जा कमी खर्च होते आणि वीज बिलही कमी येतं. अंदाजानुसार, एअर कंडिशनर 24 डिग्री सेल्सिअस तापमानावर सेट केल्याने ऊर्जा संवर्धनाची एकूण क्षमता वार्षिक 20 अब्ज युनिट्स म्हणजेच 10,000 कोटी एवढी होऊ शकते. निम्म्या लोकांनी जरी हा नियम पाळला तरी त्यामुळे सुमारे 10 अब्ज युनिट विजेची बचत होईल. हे प्रमाण दरवर्षी 8.2 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड कमी करण्याएवढं आहे. थर्मोस्टॅटमध्ये एसी सेट केल्यावर तो खोलीतील हवेचं तापमान तपासतो आणि तापमान योग्य झाल्यावर कॉम्प्रेसर थांबवतो. त्यामुळे एसी तापमान कमी पातळीवर सेट केल्यास, कॉम्प्रेसर जास्त काळ काम करेल. तसंच वीज बिल कमी करण्यासाठी एसीचं तापमान 18 डिग्री सेल्सिअसवरून 24 डिग्री सेल्सिअसवर बदलल्यास वीज बिल वार्षिक सुमारे 4,000 रुपयांनी कमी होईल. परंतु, जर तुम्ही AC चं तापमान 27°C वर ठेवलं तर वार्षिक बिल 18°C च्या तुलनेत सुमारे 6,500 रुपयांनी कमी होईल. वाढत्या वयानुसार ब्लड शुगर लेवल नेमकी किती असावी? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं अमेरिकन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (American Society Of Heating, Refrigerator and Air Conditioning Engineers) यांनी केलेल्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही 23 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात झोपत असाल तर तुम्हाला श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय छातीत जंतूसंसर्ग, शरीरात कोरडेपणा, डोकेदुखी, सांधेदुखी यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे झोपताना 23.5 °C ते 25.5 °C खोलीतील तापमान असणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे एअर कंडिशनरचं डीफॉल्ट तापमान 24 डिग्री सेल्सिअसवर सेट करून तुम्ही उर्जेची बचत करू शकता आणि तुमच्या वीजबिलात बचत करू शकता. त्याचबरोबर हे तुमच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर ठरतं.

)







