मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वाढत्या वयानुसार ब्लड शुगर लेवल नेमकी किती असावी? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

वाढत्या वयानुसार ब्लड शुगर लेवल नेमकी किती असावी? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

1- आहारात हेल्दी कार्बोहायड्रेट घ्या. तळलेल्या गोष्टींऐवजी संपूर्ण धान्य खा. याशिवाय नाचणी, ज्वारी, तांदूळ यांचा आहारात समावेश करा.

1- आहारात हेल्दी कार्बोहायड्रेट घ्या. तळलेल्या गोष्टींऐवजी संपूर्ण धान्य खा. याशिवाय नाचणी, ज्वारी, तांदूळ यांचा आहारात समावेश करा.

शरीरातली ब्लड शुगर लेव्हल असंतुलित राहण्यामागे अनेक कारणं असतात, त्या कारणांकडेही वेळीच लक्ष देणं आवश्यक असतं. ब्लड शुगर लेव्हल नेमकी किती असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. या विषयी संशोधन केलं असून, प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी ब्लड शुगर लेव्हलचं मानक हे वेगवेगळं असतं.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 2 मे : गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणांमुळे डायबेटिसच्या (Diabetes) रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डायबेटिस हा गंभीर आणि चिवट स्वरुपाचा आजार मानला जातो. डायबेटिस असलेल्या रुग्णाला सातत्यानं ब्लड शुगर लेव्हलकडे (Blood Sugar Level) लक्ष द्यावं लागतं. ब्लड शुगर लेव्हल सातत्यानं वाढत असेल किंवा कमी होत असेल तर तातडीनं वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. शरीरातली ब्लड शुगर लेव्हल असंतुलित राहण्यामागे अनेक कारणं असतात, त्या कारणांकडेही वेळीच लक्ष देणं आवश्यक असतं. ब्लड शुगर लेव्हल नेमकी किती असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. अमेरिकन डायबेटिस असोसिएशनने (American Diabetes Association) या विषयी संशोधन केलं असून, प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी ब्लड शुगर लेव्हलचं मानक (Standard) हे वेगवेगळं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.

  डायबेटिस हा गंभीर स्वरुपाचा आणि अन्य आजारांसाठी कारणीभूत ठरणारा विकार आहे. त्यामुळे सातत्यानं तपासणी आणि औषधोपचार घेणं महत्त्वाचं ठरतं. अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या (ADA) म्हणण्यानुसार, जसजसं वय वाढतं तसतसं शरीरातल्या शुगर लेव्हलचं मानकदेखील बदलतं. 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी आणि 60 वर्षांखालील व्यक्तींसाठी शुगर लेव्हलचं मानक वेगवेगळं असतं. वाढत्या वयात शुगर लेव्हल वाढल्यामुळे कोणतीही नवीन समस्या निर्माण होण्याचा धोका कमी असतो, असं `एडीए`च्या संशोधनात म्हटलं आहे.

  डायबेटिस तज्ज्ञांच्या मते, प्री-डायबेटिक (Pre-Diabetic) ही विशिष्ट अशी स्टेज असते यात संबंधित व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असतं आणि डायबेटिसची सुरुवातीची लक्षणं काही काळापूर्वी दिसून आलेली असतात. या व्यक्ती निरोगी असतात. परंतु, या व्यक्तींनी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं गरजेचं असते. कारण ब्लड शुगर लेव्हल वाढली तर या व्यक्तींना किडनी, हृदयविकार, ब्लड प्रेशरसारखे आजार होण्याचा धोका असतो. या वयोगटातल्या व्यक्तींची रिकाम्यापोटी ब्लड शुगर लेव्हल 100 च्या आसपास तर खाल्ल्यानंतरची ब्लड शुगर लेव्हल 140 पेक्षा कमी असणं गरजेचं असतं. तसंच तीन महिन्यांची सरासरी ब्लड शुगर लेव्हल अर्थात एचबीए1सी (HbA1c) चाचणीत साखरेचं प्रमाण 7 टक्क्यांपेक्षा कमी असावं. मात्र ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असतं, त्यांना कोणतेही नवीन आजार होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे त्यांची ब्लड शुगर लेव्हलची मानकं वाढवता येऊ शकतात.

  डायबेटिस तज्ज्ञ डॉ. अशोक कुमार झिंगन यांच्या म्हणण्यानुसार, ``शुगर कंट्रोलवरील औषधांमुळे काही वेळा रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल खूप कमी होते. ही स्थिती ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच धोकादायक ठरू शकते. अशा व्यक्ती बाथरूममध्ये पडून जखमी होण्याची किंवा बेशुद्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींची खाण्यापूर्वीची ब्लड शुगर लेव्हल 120 ते 130 पर्यंत तर खाल्ल्यानंतर 180 पर्यंत सामान्य समजली जाते. ``सध्याच्या काळात आहारात झालेले बदल, बदलती जीवनशैली, डिप्रेशन, एकटेपणा आणि हायपरटेन्शन आदी समस्यांमुळे बहुतेक लोक वयाची साठी ओलांडण्यापूर्वीच विविध प्रकारच्या धोकायदायक आजारांना बळी पडत आहेत. डायबेटिस हा त्यापैकीच एक आजार होय. अलीकडच्या काळात डायबेटिसच्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. डायबेटिसमध्ये रुग्णाची ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होते. पूर्वी हा आजार केवळ ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येत होता. मात्र आता कमी वयाच्या लोकांमध्येही हा आजार दिसून येत आहे. मात्र जेष्ठ नागरिकांमध्ये शुगर वाढल्याने नवीन आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका कमी होत आहे,`` असं डॉ. झिंगन यांनी सांगितलं.

  हे वाचा - Health Tips: शरीरात रक्त कमी होण्याचा त्रास कधी नाही होणार; हे 4 ज्युस त्यासाठी आहेत उपयोगी

  ``या आजारामुळे शुगर लेव्हल (Sugar Level) इतकी कमी होते की अनेक रुग्णांना थकवा, चक्कर येणं, जास्त घाम येणं आणि चिडचिड होणं अशा समस्या जाणवतात. वाढत्या वयोमानानुसार, डायबेटिस आजकाल सामान्य झाला आहे. परंतु, भारतासह जगातल्या बहुतेक देशांमध्ये प्री-डायबेटिकची प्रकरणंदेखील समोर येत आहेत,`` असं डॉ. झिंगन यांनी सांगितलं.

  शरीरातली ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होण्यामागे अनेक कारणं असतात. काहीवेळा जास्त वेळ उपाशी (Fasting) राहिल्यानंदेखील ब्लड शुगर लेव्हल कमी होते. तसंच ही लेव्हल तुमची खाण्या-पिण्याची सवय आणि जीवनशैलीवरही अवलंबून असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीने 8 तासांपेक्षा जास्त काळ काही खाल्लं नसेल तेव्हा ही वेळ रक्तातली ब्लड शुगर लेव्हल तपासण्यासाठी सर्वोत्तम समजावी. त्यामुळे सकाळच्या वेळी उपाशीपोटी ब्लड शुगर तपासणं योग्य मानलं जातं. शरीरातील नॉर्मल ब्लड शुगर पातळी 90 ते 100 mg/dl पर्यंत असते. परंतु, जेव्हा तुम्ही जेवण करता किंवा काही खाता तेव्हा ती वाढून 140 mg/dl पर्यंत वाढते. ब्लड शुगर पातळी यापेक्षा अधिक वाढलेली असेल तर डायबेटिस होतो.

  परंतु, वय आणि आरोग्याच्या स्थितीमुळे व्यक्तीची ब्लड शुगर लेव्हल वाढू किंवा कमी होऊ शकते. त्यामुळे डायबेटिस नसलेल्या लोकांच्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल सकाळी उपाशीपोटी 100mg/dl आणि जेवल्यानंतर दोन तासांनी 140 mg/dl असणं आवश्यक आहे.

  First published:
  top videos

   Tags: Diabetes, Tips for diabetes