Home /News /lifestyle /

WHO ने दिली खूशखबर; या वर्षाअखेरपर्यंत तयार होणार कोरोनाची लस

WHO ने दिली खूशखबर; या वर्षाअखेरपर्यंत तयार होणार कोरोनाची लस

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुख शास्त्रज्ञांनी कोरोना लस (coronavirus vaccine) कधीपर्यंत येईल याबाबत माहिती दिली आहे.

    जिनिव्हा, 19 जून :   जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसवर प्रभावी लस (coronavirus vaccine) तयार करण्यासाठी जुटलेत. ही लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) याचं उत्तर दिलं आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाव्हायरसवरील लस येईल, अशी आशा WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी कोविड-19 लस तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील लस तयार होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. soumya swaminathan) यांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, "जवळपास 10 कंपन्यांच्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे आणि त्यापैकी कमीत कमी तीन कंपन्यांच्या लस अशा टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत, जिथं लसीचा प्रभाव किती आणि कसा आहे हे स्पष्ट होईल" "लस विकसित करणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्याबाबत अनिश्चिततादेखील आहे. मात्र आपल्याकडे अनेक कंपन्या लस तयार करत आहे, ही एक चांगली बाब आहे. आपलं नशीब असेल तर या वर्षाच्या अखेरपर्यंत एक किंवा दोन कंपन्या तरी प्रभावी लस तयार करण्यात यशश्वी होतील, अशी मला आशा आहे", असं त्या म्हणाल्या. हे वाचा - अनलॉक 1 जाहीर केल्यानंतर राज्यातील या शहराने केली 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा दरम्यान कोरोनाव्हायरसची लस वर्षभरात येईल मात्र तोपर्यंत हा आजार सामान्य तापासारखा होईल, असं सौम्या स्वामिनाथन (Soumya Swaminathan) यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या, "प्रभावी लस येईपर्यंत हा नवा कोरोनाव्हायरस इतर इन्फ्लूएंझा व्हायरसप्रमाणे सिझनल व्हायरस होईल. ज्याचा उद्रेक वर्षातून एकदा किंवा दोनदा होईल. म्हणजे हा आजारच सर्वसामान्य होईल, ज्यामुळे लोकं सतत आजारी पडतील मात्र त्याचा त्यांच्यावर फारसा प्रभाव पडणार नाही" हे वाचा - पुण्यातील चिनी कंपनीत घुसला कोरोना, 7 कर्मचारी पॉझिटिव्ह; 130 क्वारंटाइन जगभरात कोरोनाव्हायरसचे 86 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 4 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतात सध्या 1 लाख 63 हजार 248 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा हा 2 लाख 04 हजार 711 झाला आहे. सक्रीय रुग्ण आणि निरोगी रुग्ण यांच्यातील फरक दिवसेंदिवस वाढत आहे की भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. सध्या यांच्यात तब्बल 41 हजार 462चा फरक आहे. तर आतापर्यंत 12 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - न्हावी आणि ग्राहकामुळं अख्खं शहर हादरलं, क्वारंटाईनमध्येच केस कापायला गेला महाराष्ट्रात 3752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 20 हजारहून अधिक आहे. तर, 1672 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा 5751 झाला आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - लॉकडाऊन आणखी वाढणार! लवकरच निर्णय, महापौर म्हणाले... जान है तो जहान है
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Vaccine, Who

    पुढील बातम्या