Home /News /national /

न्हावी आणि ग्राहकामुळं अख्खं शहर हादरलं, क्वारंटाईनमध्येच केस कापायला गेला आणि...

न्हावी आणि ग्राहकामुळं अख्खं शहर हादरलं, क्वारंटाईनमध्येच केस कापायला गेला आणि...

रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन दाढी करणं महागात पडलं आहे. हे प्रकरण जमशेदपूरमधील आहे.

    जमशेदपूर, 19 जून : कोरोनाबाधितांच्या संख्या देशात वाढत असताना दुसरीकडे अनलॉक 1.0 ची सुरुवातही करण्यात आली आहे. यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळं विशेष सुरक्षा बाळगून सलून दुकानं सुरू करण्यात आली आहेत. मात्र आता यामुळंच अख्खं शहर धोक्यात आलं आहे. रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन दाढी करणं महागात पडलं आहे. हे प्रकरण जमशेदपूरमधील आहे. जिल्हा प्रशासनानं त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या या व्यक्तीनं होम क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केले, त्याचबरोबर घरी केस कापण्यासाठी सलूनवाल्यालाही बोलवलं. गुन्हा दाखल करण्यात आलेली व्यक्ती हृदयवरील उपचार घेऊन घरी पोहचला. त्यानंतर रात्री उशीरा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आली. एवढेच नाही तर प्रशासनाला तापासात असेही कळले की कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी केस कापण्यासाठी आलेल्या न्हाव्यानं तब्बल 70 लोकांचेही केस कापले होते. सध्या यातील 14 लोकांचा शोध घेऊन सरकारी क्वारंटाइनमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे. या सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्लीहून त्या व्यक्तीला घरी पोहचवणाऱ्या टेम्पो चालकालाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सर्वांच्या कोरोना तपासणीसाठी नमुना गोळा केला जात आहेत. वाचा-प्रेग्नन्सी किटप्रमाणेच अर्धा तासांत समजणार कोरोनाचा रिपोर्ट, अशी होणार चाचणी उपायुक्त रवीशंकर शुक्ला यांनी जिल्ह्यातील जनतेला होम क्वारंटाइनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अगदी थोडासा दुर्लक्ष बऱ्याच लोकांचा जीव धोक्यात टाकू शकतो. तसेच लोकांना सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्याचा आणि अनिवार्यपणे मास्क आणि सेनिटायझर्सचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. वाचा-पुण्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक, दिवसभरात वाढले सर्वाधिक रुग्ण
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या