मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Work From Home करताना जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहता?, वेळेआधीच ओळखा त्यामागचे दुष्परिणाम

Work From Home करताना जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहता?, वेळेआधीच ओळखा त्यामागचे दुष्परिणाम

कोरोनापूर्व काळात किमान ऑफिसला जाण्या-येण्यासाठी तरी थोडीफार पायपीट होत होती. मात्र वर्क फ्रॉम होममुळे तेही बंद झाले आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर (Effects of Long Sitting) होतो आहे.

कोरोनापूर्व काळात किमान ऑफिसला जाण्या-येण्यासाठी तरी थोडीफार पायपीट होत होती. मात्र वर्क फ्रॉम होममुळे तेही बंद झाले आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर (Effects of Long Sitting) होतो आहे.

कोरोनापूर्व काळात किमान ऑफिसला जाण्या-येण्यासाठी तरी थोडीफार पायपीट होत होती. मात्र वर्क फ्रॉम होममुळे तेही बंद झाले आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर (Effects of Long Sitting) होतो आहे.

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: गेल्या दोन वर्षांपासून बऱ्याच कंपन्या वर्क फ्रॉम होम सुविधा देत असल्यामुळे कामाचे तास काही ठिकाणी वाढले आहेत. यादरम्यान आपण जवळपास आठ ते नऊ तास एकाच ठिकाणी बसून (Sitting for a long time) असतो. त्यानंतरही कुठेच जायचे नसल्यामुळे आपला जराही व्यायाम होत नाही. कोरोनापूर्व काळात किमान ऑफिसला जाण्या-येण्यासाठी तरी थोडीफार पायपीट होत होती. मात्र वर्क फ्रॉम होममुळे तेही बंद झाले आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर (Effects of Long Sitting) होतो आहे. बराच काळ एका ठिकाणी बसून राहिल्याने शरीरातील ब्लड फ्लो धीम्या गतीने (Slow blood flow effects) होतो, ज्याचे बरेच दुष्परिणाम आपल्याला पुढे पहायला मिळतात.

शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन (Blood circulation) चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. जर शरीराच्या प्रत्येक भागात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचला नाही, त्याचे विविध दुष्परिणाम दिसू लागतात. हात-पाय बधिर होणे, त्वचा पातळ होणे, पायांचा रंग निळसर पडणे, त्वचा कोरडी होणे, नखं आपोआप तुटणे आणि केसांची मोठ्या प्रमाणात गळती होणे ही सगळी कमी ब्लड सर्क्युलेशनची (Slow Blood circulation effects) लक्षणे आहेत. दैनिक भास्करच्या एका रिपोर्टमध्ये ब्लड फ्लो कमी होण्याची कारणे (Causes of slow blood flow) दिली आहेत. या रिपोर्टनुसार, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे, उच्च रक्तदाब, धूम्रपान, अनहेल्दी डाएट आणि व्यायामाचा अभाव ही त्याची मुख्य कारणं आहेत.

जास्त वेळ बसून राहणे

पबमेड जीओव्हीने (PubMed Gov) दिलेल्या माहितीनुसार, खाली बसल्यानंतर किंवा झोपल्यानंतर पायातील पेशींमधील ब्लड फ्लो तब्बल 90 टक्क्यांपर्यंत कमी होतो. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने ब्लड क्लॉटिंगची (Blood Clotting) शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी एकाच ठिकाणी सलग न बसता, दर अर्ध्या तासानंतर सुमारे 3 मिनिटांचा गॅप घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा-  तुम्हाला माहीत आहे का लघवी करताना जळजळ का होते? जाणून घ्या कारणे आणि निदान

 हाय ब्लड प्रेशर

हेल्थलाईन वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, उच्च रक्तदाबामुळे आर्टरीज (Arteries) कडक होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवरही दुष्परिणाम होतो.

धूम्रपान

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, सिगारेट आणि तंबाखूमध्ये असणारे निकोटीन हे धमन्यांसाठी (Arteries) हानीकारक असते. तसेच, यामुळे रक्त अधिक दाट होते, ज्यामुळे ब्लड फ्लोची गती (Smoking causes slow blood flow) कमी होते.

अशी घ्या काळजी

रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी पालेभाज्यांचा बराच फायदा होतो. पालेभाज्यांमध्ये असणारे नायट्रेट हे शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड बनते. यामुळे ब्लड व्हेसल्स (Blood vessels) मोठ्या होतात. परिणामी ब्लड फ्लो अधिक सहजपणे आणि वेगाने होतो. यासोबतच, दररोज सुमारे पाच किलोमीटर प्रतितास या वेगाने चालल्यासही (Fast walking improves blood flow) ब्लड फ्लो सुधारण्यासाठी मदत होते.

हेही वाचा-  Type 2 Diabetes: या सवयी टाइप 2 मधुमेहाच्या रूग्णांसाठी असतात धोकादायक, वेगाने पसरतो आजार

 एकूणच, शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी, आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला खानपान, सवयी आणि व्यायाम या सर्वांचा योग्य ताळमेळ जमवणे गरजेचे आहे.

First published:

Tags: Work from home