नवी दिल्ली, 13 डिसेंबर : तुम्हाला टाईप 2 मधुमेहाची समस्या असेल तर, तुम्ही तुमच्या रोजच्या काही सवयी ताबडतोब बदलल्या पाहिजेत. तसंच, आहाराचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्हाला या आजाराचं अचानक निदान होतं, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी आणि त्यासाठी कोणती आवश्यक खबरदारी घ्यावी, हे अनेकदा समजत नाही. मधुमेहाचा आजार ठरू शकतो प्राणघातक ‘झी न्यूज’ने दिलेल्या बातमीनुसार, इन्सुलिन हार्मोन शरीरातील ग्लुकोजचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकत नाही तेव्हा टाईप 2 मधुमेहाची समस्या उद्भवते. मधुमेह घातक ठरू शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात आवश्यक बदल करणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप जास्त असते, तेव्हा त्याचा तुमच्या मूड आणि एनर्जी लेव्हलवरही परिणाम होतो. टाईप 2 मधुमेहामध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही या आजारावर नियंत्रण ठेवू शकता. रक्तातील साखरेची उच्च पातळी मज्जासंस्था, रक्तवाहिन्या, डोळे, हृदय आणि मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवू शकते. जाणून घ्या, मधुमेही रुग्णांनी कोणत्या बाबींची विशेष काळजी घ्यावी. हेल्दी ईटिंग प्लान प्रक्रिया न केलेल्या संपूर्ण अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. फक्त घरी बनवलेले पदार्थ खा. साखर आणि कर्बोदकं जास्त प्रमाणात असलेले पदार्थ खाऊ नका. रक्तातील साखर कमी झाल्यास हे पदार्थ खाता येऊ शकतात. सोडा आणि फळांचा रस जास्त प्रमाणात आणि वारंवार घेऊ नका. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. कोणत्याही प्रकारचे पॅकेज केलेलं आणि रिफाइंड आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाऊ नका. अन्नापैकी अर्धा भाग सॅलड्स आणि भाज्यांचा आणि एक तृतीयांश भाग कर्बोदकांचा असावा. प्रथिनयुक्त पदार्थ एक तृतीयांश भागामध्ये ठेवा. हे वाचा - Business Idea: सरकारी मदतीने कमी गुंतवणुकीतून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल भरभक्कम कमाई आहारात हेल्दी फॅट आणि प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळं साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होईल. नियमित शारीरिक क्रियाकलाप आवश्यक आरोग्यदायी आहारासह, नियमित शारीरिक क्रियाकलापदेखील आवश्यक आहेत. अन्न तुम्हाला ऊर्जा देतं आणि दैनंदिन क्रियाकलाप शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतात. अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या मते, तुमच्यासाठी 30 मिनिटांचा एरोबिक व्यायाम आवश्यक आहे. यामध्ये चालणं, पुशिंग, पुलिंग आणि लिफ्टिंग यासारखे रेसिस्टंस ट्रेनिंग असणं आवश्यक आहे. यापैकी चालण्याचा व्यायाम रोज करावा. तर, इतर व्यायाम तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस करू शकता. तुमच्या शारीरिक व्यायामामध्ये एरोबिक किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामप्रकार समाविष्ट करा. यामुळे हृदय आणि फुफ्फुसं निरोगी राहू शकतात. यासाठी चालणं, सायकल चालवणं, पोहणं, नृत्य करणं आणि पायऱ्या चढणं या गोष्टी कराव्यात. हे वाचा - Network18 Sanjeevani Telethon: कृष्ण एलांकडून बुस्टर डोसचं समर्थन, तर पूनावाला म्हणाले लस अजूनही प्रभावी रेसिस्टंस आणि स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचाही तुम्हाला फायदा होईल. यामध्ये उचलणं, खेचणं आणि ढकलणं हे प्रकार केले जाऊ शकतात. स्ट्रेचिंग आणि लवचिकता क्रियाकलाप देखील फायदा होईल. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासा रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासा आणि त्याच्यात होणारी वाढ आणि घसरण यावर लक्ष ठेवा. नियमितपणे चेकअप करण्यासाठी जा. तपासणी हा मधुमेहाची काळजी घेण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळं ग्लुकोजची पातळी गंभीर स्थितीत जाण्यापूर्वीच तुम्हाला उपाययोजना करता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.