मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हाला माहीत आहे का लघवी करताना जळजळ का होते? जाणून घ्या कारणे आणि निदान

तुम्हाला माहीत आहे का लघवी करताना जळजळ का होते? जाणून घ्या कारणे आणि निदान

Causes of painful urination or dysuria: डिस्युरियाची अनेक कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लघवी करताना होणारी जळजळ जास्त त्रासदायक वाटत नसते. यामुळं त्याकडं दीर्घकाळ दुर्लक्ष केलं जातं आणि धोका वाढतो.

Causes of painful urination or dysuria: डिस्युरियाची अनेक कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लघवी करताना होणारी जळजळ जास्त त्रासदायक वाटत नसते. यामुळं त्याकडं दीर्घकाळ दुर्लक्ष केलं जातं आणि धोका वाढतो.

Causes of painful urination or dysuria: डिस्युरियाची अनेक कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लघवी करताना होणारी जळजळ जास्त त्रासदायक वाटत नसते. यामुळं त्याकडं दीर्घकाळ दुर्लक्ष केलं जातं आणि धोका वाढतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : कधीकधी लघवी करताना जळजळ होण्याच्या त्रास आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी झाला असेल. वैद्यकीय भाषेत याला डिसूरिया (Dysuria) म्हणतात. या अवस्थेत, कधीकधी लघवीच्या मार्गात जळजळ होते. तर कधी तीव्र वेदना होतात. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर लघवी करताना आग होत असल्याचं जाणवतं. तसंच, जडपणाची भावनादेखील होते. लघवीचा थेट संबंध शरीरातील मूत्राशय आणि मूत्रपिंडाशी असल्यानं लघवी करताना या दोन्ही अवयवांवरही (Causes of painful urination or dysuria) परिणाम होतो.

या आजाराची वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसू शकतात. डिस्युरियाची अनेक कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लघवी करताना होणारी जळजळ जास्त त्रासदायक वाटत नसते. यामुळं त्याकडं दीर्घकाळ दुर्लक्ष केलं जातं आणि धोका वाढतो. म्हणूनच, लघवीत जळजळ का होते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

काय आहे लघवीमध्ये जळजळ होण्याचं कारण

UTI

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, लघवीला जळजळ किंवा वेदनादायक लघवीची अनेक कारणे असू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला मूत्रमार्गात संसर्ग झाला असेल; म्हणजेच, मूत्रमार्गात बॅक्टेरियाची संख्या जास्त प्रमाणात वाढली असेल, तर लघवीमध्ये जळजळ होऊ शकते. या अवस्थेत वारंवार लघवीची इच्छा होणं, कधी लघवीच्या मार्गात रक्त येणं, ताप येणं, लघवी करताना जडपणा जाणवणं, पाठदुखी इत्यादी लक्षणं दिसतात.

STI

क्लॅमिडीया, गोनोरिया, नागीण इत्यादी लैंगिक संक्रमित रोगांमुळंदेखील लघवी करताना जळजळ होते. या स्थितीत वेगवेगळी लक्षणं दिसतात. यामध्ये गुप्तांगाभोवतीच्या भागात पुरळ किंवा फोडासारखी स्थिती होऊ शकते.

प्रोस्टेट संसर्ग

प्रोस्टेटमध्ये संसर्ग फक्त पुरुषांना होऊ शकतो. याला प्रोस्टेटायटीस म्हणतात. प्रोस्टेटमध्ये सूजदेखील असू शकते. लैंगिक संक्रमित रोगांमुळेही प्रोस्टेटला सूज येऊ शकते. प्रोस्टेटमध्ये संसर्ग झाल्यामुळं लघवी करताना खूप वेदना होतात. मूत्राशय आणि गुप्तांगामध्येही वेदना होतात. याशिवाय वीर्यपतनातही खूप वेदना होतात.

मुतखडा

मुतखडा असल्यास लघवी करताना जळजळ होऊ शकते. यामध्ये लघवीचा रंग गुलाबी किंवा तपकिरी होतो. यासह त्यात ताप, उलट्या, बेचैनी यांसारखी लक्षणंही दिसू लागतात.

हे वाचा - लग्न करण्यासाठी पळून जातानाच दुचाकीला अपघात; प्रेयसीचा भयावह अंत, प्रियकर गंभीर

केमिकल

काही रसायनांच्या वापरामुळंदेखील डिसूरिया होऊ शकतो. उदाहरणार्थ, काही साबण, सेंटेड टॉयलेट पेपर, गर्भनिरोधक फोम, व्हजायनल ल्युब्रिकण्ट, गुप्तांगासाठी वापरलेली काही रसायनं इत्यादींमुळेही लघवी करताना जळजळ होऊ शकते.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

काय आहे उपचार

सामान्यतः डिस्युरियाचा आजार एक-दोन दिवसांत बरा होतो. परंतु, काही बाबतीत डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं. दोन दिवसानंतरही जळजळ होत राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. यासाठी सामान्य प्रतिजैविकं उपलब्ध आहेत. मात्र, ती डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावीत.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips