Home /News /lifestyle /

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

उत्तम आरोग्यासाठी आपल्याला आहारात तेलाचा वापर प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करावा लागतो. आपल्या आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) उपयुक्त असल्याचं पाश्चिमात्य आहारतज्ज्ञांचं मत आहे. पण ते तळणासाठी, फोडणीसाठी वापरू नये. आपल्या देशातल्या पारंपरिक तेलांपैकी कुठलं तेल चांगलं?

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगतवेगळ्या आहेत. आंबट, गोड, तिखट, चमचमीत अशा वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खायला सर्वानाच आवडते. त्यातही तळलेले पदार्थ सर्वांच्या विशेष आवडीचे असतात. मग हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या तेलांचादेखील वापर करतो. मात्र सर्वच प्रकारचे तेल आपल्या शरीरासाठी चांगले असतात का ? कोणते तेल आपल्या शरीरासाठी जास्त चांगले असते ? (Which Oil Is More Beneficial For Health) आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहोत. जाणून घेऊया आपल्या रोजच्या वापरातील कोणते तेल आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. ऑलिव्ह ऑईल ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. यात ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड (Omega-6 And Omega-3 Fatty Acids) असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये शरीराला आवश्यक असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतात. हे तेल खूप पौष्टिक असते. यात काही प्रमाणात व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-के देखील असते (Olive Oil Is Good For Health). त्यामुळे अनेक जण या तेलाला पसंती देतात. ऑलिव्ह ऑईल शरीरातील जळजळ देखील कमी होते. शेंगदाणा तेल शेंगदाण्यापासून हे तेल बनवले जाते. घरातील अन्नपदार्थ बनवण्यासाठी अनेक लोक शेंगदाणा तेलाला (Peanut Oil) पसंती देतात. या तेलात आरोग्यदायी घटक असतात. यात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तसेच या तेलात फॅटी अॅसिड असते. याशिवाय या तेलात स्टेरिक अॅसिड, पाल्मिक अॅसिड आणि ओलिक अॅसिड देखील आढळते हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. शेंगदणा तेल हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त असते. या तेलामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. या तेलात भरपूर प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड (Monounsaturated Fatty Acids) असते. जे शरीरातील चरबी वाढू देत नाही आणि बॅड कोलेस्ट्रॉलला देखील शरीरापासून दूर ठेवण्यास मदत होते. हेही वाचा... Rose water for hair: स्कीनसाठी गुलाब जल वापरलं असेल; केसांसाठीही त्याचा असा घरच्या-घरी करा उपयोग राईस ब्रान ऑइल राईस ब्रान ऑइल (Rice Bran Oil) हे स्वयंपाकासाठी उपयोगी असलेल्या आरोग्यदायी पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय आहे. यात ई जीवनसत्त्व आणि ॲंटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. तसेच हे तेल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. राईस ब्रॅन ऑइलमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स (Polyunsaturated Fats) आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे (Monounsaturated Fats) परिपूर्ण संतुलन आढळते. त्यामुळे हे तेल हृदय निरोगी ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. हे तेल त्वचेसाठी देखील उपयुक्त असते. यांतील व्हिटॅमिन-ई मुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि सुरकुत्यामुक्त होण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन ई रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते. राईस ब्रॅन ऑइल तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील ऍलर्जी दूर करते. सूर्यफूल तेल हे तेल सूर्यफुलाच्या बियांपासून (Sunflower Oil) तयार केले जाते. या तेलात भरपूर जीवनसत्व असतात. त्यामुळे हे तेल आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सूर्यफूलाच्या तेलात अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् मुबलक प्रमाणात आढळतात. यात ओलिक आणि लिनोलिक फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. तसचे यातील फॅटी अॅसिडस् शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. सूर्यफूल तेल तुम्हाला हृदयविकारापासून वाचवू शकते. याशिवाय सूर्यफूल तेलात व्हिटॅमिन-ई देखील मुबलक प्रमाणात असते. हे तेल शरीरासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. सूर्यफूल तेलामध्ये फायटोस्टेरॉल आणि टेरपेनॉइड्स हे तत्त्व आढळता. यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. हेही वाचा... मुलांच्या आहारात फळं-भाज्या असायला हव्या; त्यांच्या एकाग्रतेमध्ये असा होतो फायदा तेलांचे हे सर्व प्रकार जरी आपल्या शरीरासाठी चांगले असले, तरीदेखील कोणत्याही तेलाचा अतिवापर आपल्यासाठी घातक ठरू शकतो. जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाऊ नये. त्याचप्रमाणे एकाच तेलात वारंवार पदार्थ तळू नये. कारण असे वारंवार गरम झालेले तेल आपल्या शरीरासाठी जास्त हानिकारक असते. आपण कोणत्याही तेलाचा वापर करत असू, तरी त्याचे एक प्रमाण ठरवावे. ब्लडप्रेशर (Blood pressure), डायबिटीज (diabetes) असे काही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा आणि तेलाचा प्रमाणात वापर करावा.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Food, Health Tips

    पुढील बातम्या