नवी दिल्ली, 26 मे : आजच्या जीवनशैलीत फास्ट-फूडच्या वाढत्या वापरामुळे आहारातील फळे आणि भाज्यांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या नैसर्गिक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊन लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. जेव्हा डॉक्टर उपचारादरम्यान फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात तेव्हा आपल्याला त्याचे महत्त्व समजते. अधिक शास्त्रीय पद्धतीने याची खात्री करण्यासाठी, फळे आणि भाज्यांचे फायदे आणि त्यांच्या औषधी वापराबद्दल संशोधन केले जात आहे. काही अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, एकाग्रतेचा (concentration) अभाव आणि अती अॅक्टिव्हिटी म्हणजेच अटेन्शन डेफिसिट / हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) ग्रस्त मुलांना पुरेशी फळे आणि भाज्या खायला दिल्याने त्यांची एकाग्रता सुधारते.
एडीएचडी (ADHD) असलेल्या मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव हे मुख्य लक्षण आहे आणि यामुळे ती कोणत्याही विषयावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत किंवा एकाग्र होऊ शकत नाहीत. त्यांना कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणे किंवा आठवणीत ठेवणे कठीण जाते. यासोबतच त्यांना भावनांवर ताबा ठेवता येत नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष न्यूट्रिशनल न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात -
अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या (The Ohio State University) मानव विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक इरेन हात्सू यांनी सांगितले की, या अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या मुलांनी फळे आणि भाज्या जास्त खाल्ल्या, त्या मुलांमध्ये एकाग्रता वाढली. गंभीर कमतरतेची लक्षणे कमी झाली. त्यांनी ADHD ची लक्षणे कमी करण्यासाठी फळे आणि भाज्यांसह निरोगी आहार हा एक चांगला मार्ग आहे.
अभ्यास कसा झाला?
संशोधकांनी ADHD लक्षणे असलेल्या 134 मुलांच्या पालकांकडून एक प्रश्नावली भरली, ज्यामध्ये 90 दिवसांमध्ये मुलांच्या सामान्य आहाराचे तपशीलवार वर्णन प्राप्त झाले. इरेन हात्सू, तज्ञांचा असा विश्वास आहे की एडीएचडी मेंदूतील विशिष्ट न्यूरोट्रांसमीटरच्या कमी पातळीशी संबंधित आहे. जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला ती महत्त्वाची न्यूरोकेमिकल्स बनवण्यात आणि मेंदूच्या सर्व कार्यांमध्ये मदत करण्यासाठी सहायक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात.
त्यांनी सांगितले की, जेव्हा कोणलाही भूक लागते तेव्हा ती व्यक्ती अस्वस्थ होते, चिडचिड करते. एडीएचडीग्रस्त मुलांमध्येही असं होतं. अशा परिस्थितीत त्यांना पुरेसे अन्न न मिळाल्यास आजाराची लक्षणे आणखी वाढू शकतात. यासोबतच जेव्हा पालक आपल्या मुलांसाठी पुरेशा जेवणाची व्यवस्था करू शकत नाहीत, तेव्हा ते नाराज होतात आणि मग घरात कौटुंबिक तणावाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत, एडीएचडीने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये रोगाची लक्षणे वाढू लागतात.
हे वाचा -
मंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात
अभ्यासात काय झाले?
संशोधक इरेन हात्सू सांगतात की, आमचा अभ्यास असे सुचवतो की, मुलांना औषध देण्यापूर्वी त्यांच्या आहाराचा दर्जा, ते काय खातात, याचा या आजाराच्या वाढत्या लक्षणांशी संबंध आहे की, नाही हे तपासले पाहिजे. असे असल्यास, औषधाचा डोस वाढवण्यापूर्वी, डॉक्टरांनी आहारातील सुधारणांवर भर दिला पाहिजे आणि त्याच्या परिणामाचे मूल्यांकन केले पाहिजे.
हे वाचा -
कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा
लक्षणे कमी करण्याचा सामान्य मार्ग -
हात्सू सांगतात की, सामान्यतः असे दिसून येते की जेव्हा मुलांमध्ये एडीएचडीची लक्षणे वाढतात तेव्हा पालक त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि वाढती लक्षणे पाहता डॉक्टर औषधांचा डोस वाढवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.