Home /News /lifestyle /

Mask: कापडी मास्क किती वेळा वापरावा? संशोधनातून माहिती आली समोर

Mask: कापडी मास्क किती वेळा वापरावा? संशोधनातून माहिती आली समोर

Corona काळात कोणता मास्क (Which mask is good) वापरावा आणि कोणता वापरू नये, याविषयीची चर्चा सुरू झाली होती. त्यावर अभ्यासही झाले. कापडी मास्कबाबतच्या अभ्यासामध्ये काय समोर आलंय वाचा..

    दिल्ली, 10 सप्टेंबर : कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) जगभरात सगळ्याच देशांमध्ये तोंडावर मास्क (How many times Mask can be reused) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातून कोरोना विषाणूमुळे (Covid 19 Protocol) मोठा बचाव होत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करायला सुरूवात केली. परंतु त्यात कोणता मास्क (Which mask is good) वापरावा आणि कोणता वापरू नये, याविषयीची चर्चा सुरू झाली होती. त्यावर अभ्यासही झाले. कापडी मास्क हा धुवून पुन्हा वापरता येतो. पण असा कपड्याचा मास्क जास्तीत जास्त किती काळ वापरू शकतो यावर संशोधन झालं. त्यामध्ये हा मास्क एका वर्षांहून अधिक काळ टिकू शकतो, असं समोर आलं आहे, कोरोना विषाणूचं संक्रमण (Corona infection) कापडी मास्क रोखण्यात यशस्वी ठरतो. इतर मास्कच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण होतं, अशीही माहिती समोर आली आहे. याबाबत अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील सहायक प्रोफेसर  लेखिका मरीना वेन्स यांनी बोलताना म्हटलं आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बातमी आहे. कापडी मास्क वापर झाल्यानंतर तात्काळ धूवूही शकतो, त्यामुळे अशा पद्धतीच्या मास्कचा वापर झाल्यावर त्याला फेकून देण्याचीही गरज नाही. High Blood Pressure चा त्रास आहे? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश या संशोधनासाठी अमेरिकेतील लोकांची मास्कबाबत मतं जाणून घेण्यात आली होती. मास्कचा वापर झाल्यानंतर आजूबाजूला फेकून देण्यात येत होतं. अशा या परिस्थितीबाबत आम्ही चिंतीत होतो. कारण असे वापरलेले मास्क फेकणं अधिक धोकादायक, असं मरीना वेन्स यांनी स्पष्ट केलं. या संशोधनात विविध पद्धतीने बनवलेल्या मास्कचे अध्ययन करण्यात आले होते. असं मरीना वेंस यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे कपड्याचा मास्क हा इतर मास्कच्या तुलनेत चांगला किफायतशीर ठरला आणि अधिक सुरक्षा प्रदान करताना आम्हाला या संशोधनात दिसून आलं असं त्या म्हणाल्या. त्यामुळे आता कोरोनापासून बचाव करताना लोकांना याचा फायदा होणार आहे, त्याचबरोबर सातत्याने मास्क बदलण्याचीही गरज नाही, विशेष म्हणजे यापासून कोरोनावर मात करणे सहज सोपे होईल.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Health Tips, Mask

    पुढील बातम्या