मुंबई, 06 जुलै: सध्या फिटनेसवर (Fitness) खूप लोक लक्ष देतात. लठ्ठ लोक सडपातळ होण्यासाठी तर बारीक लोक योग्य शरीरयष्टी मिळवण्यासाठी एक्सरसाइझ (Exercise) करतात. पण कधीकधी एकच एक्सरसाइझ काही जणांवर परिणाम करते तर काही जणांवर नाही. मग नेमकी आपल्यासाठी कोणती एक्सरसाइझ योग्य हे ओळखायचं तरी कसं? आता याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुमच्यासाठी कोणती एक्सरसाइझ योग्य आहे हे फक्त एका ब्लड टेस्टमार्फत (Blood test) समजू शकतं.
रक्तातील प्रोटिनवरून कोणत एक्सरसाइझ तुमच्यासाठी योग्य आहे आणि कोणती नाही, हे समजू शकतं, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, बेथ इज्राइल डिकॉनेस मेडिकल सेंटर आणि इतर इन्स्टिट्यूटने हे संशोधन केलं आहे. नेचर मेटाबोलिझ्सममध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
हे वाचा - नव्या संशोधनाने चिंता वाढवली; डेल्टाविरोधात 8 पट कमी प्रभावी ठरली कोरोना लस
रिपोर्टनुसार 654 पुरुष आणि महिलांवर हा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या रक्ताची नीट तपासणी करण्यात आली. एक्सरसाइझ करण्याआधी आणि एक्सरसाइझ केल्यानंतर असे दोन डेटा तयार करण्यात आले आणि त्यातून ब्लट टेस्टमार्फत योग्य एक्सरसाइझ निवडता येऊ शकते, असं दिसून आलं.
वेगवेगळ्या शरीरातील ब्लड मॉलिक्युल्स एक्सरसाइझवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. ब्लडस्ट्रिममधील काही प्रोटिनची पातळी तपासल्यानंतर एखादी एक्सरसाइझ तुमच्यासाठी योग आहे की नाही, हे समजू शकतं. 147 प्रोटिन हे बेसिक फिटनेसशी संबंधित असतात. प्रोटिनच्या कमी-जास्त प्रमाणानुसार फिटनेसबाबत समजतं.102 प्रोटिन परफेक्ट एक्सरसाइझबाबत सांगू शकतात. या प्रोटिनच्या कमी-जास्त पातळीवरून एक्सरसाइझचा किती परिणाम होईल, याची माहिती मिळू शकेल, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
हे वाचा - हात आहे की हातोडा! फक्त कोपराने एका मिनिटात धडाधड फोडले 279 अक्रोड; पाहा VIDEO
याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे, पण हे संशोधन यशस्वी झाल्यास मोठं फायद्याचं ठरेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.