मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /नव्या संशोधनाने चिंता वाढवली; Delta variant विरोधात 8 पट कमी प्रभावी ठरली कोरोना लस

नव्या संशोधनाने चिंता वाढवली; Delta variant विरोधात 8 पट कमी प्रभावी ठरली कोरोना लस

डेल्टा व्हेरिएंटवर (Delta Strain) कोरोना लस (Corona Vaccine) किती प्रभावी आहे, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 05 जुलै : भारतासह जगभरात काही देशात कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेन (Delta Strain)चिंता वाढवली आहे. काही लशी या डेल्टा व्हेरिएंटवर (Corona vaccine for delta strain) प्रभावी असल्याचं सांगितलं जातं आहे. पण याबाबत आता आणखी एक संशोधन समोर आलं आहे. ज्यामध्ये वुहान व्हेरिएंटपेक्षा डेल्टा व्हेरिएंटवर (Delta Variant) कोरोना लशीचा प्रभाव खूपच कमी असून उलट हा व्हेरिएंट अधिकच संसर्गजन्य असल्याचं दिसून आलं आहे.

Sars-Cov-2 B.1.617.2 डेल्टा व्हेरिएंटवर कोरोना लशीचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. भारतातील संशोधकांनी कँब्रिज युनिव्हर्सिटीसह हा अभ्यास केला. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयासह देशातील इतर सेंटर्समधील 100 आरोग्य कर्मचाऱ्यांवर या अभ्यासात समावेश होता.

हे वाचा - कोरोनातून बरं झालेल्यांमध्ये आढळली Bone death ची समस्या; मुंबईतील डॉक्टर चिंतेत

वुहानमधील कोरोना स्ट्रेनशी तुलना करता कोरोना लशीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंटवर आठपट कमी परिणाम होतो आहे. पण कोरोना लशीवरच हा व्हेरिएंटवर भारी पडत नाही तर श्वसन प्रणाली अधिक संसर्गजन्य बनून जास्तीत जास्त लोकांपर्यंत संसर्ग पसरवण्याची क्षमताही या स्ट्रेनमध्ये आहे.

या व्हेरिएंटमध्ये वुहान स्ट्रेनपेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत संसर्ग पसरवण्याची क्षमता आहे.  पूर्णपणे कोरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये B.1.1.7 (Alpha variant) आणि B.1.617.1 (Kappa variant) कप्पा व्हेरिएंटपेक्षाही डेल्टा प्लस जास्तीत जास्त पसरत आहे, असं या संशोधनात दिसून आलं.

हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुरुषांच्या आकड्यात झाला 'हा' मोठा फरक

सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. चांद वत्तल यांनी सांगितलं, "जर आपण आपली शस्त्रं खाली ठेवली तर आपण व्हायरला वाढण्याची आणि त्याला अधिक मजबूत होण्याती संधी देतत आहोत. जरी तुम्ही लस घेतली तरी लसीकरण झाल्याने तुम्ही तुमचे शस्त्रं खाली ठेवू नये, हेच या अभ्यासातून दिसून येतं"

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus