पाठवायचा होता एकाला मेसेज गेला भलत्यालाच; गोंधळ टाळण्यासाठी नवा Whatsapp feature

पाठवायचा होता एकाला मेसेज गेला भलत्यालाच; गोंधळ टाळण्यासाठी नवा Whatsapp feature

मेसेज पाठवताना होणाऱ्या प्रत्येकाच्या या गोंधळाचं सोल्युशन Whatsapp नं शोधून काढलं आहे.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : अनेकदा व्हॉट्सॲपवर (whatsapp) इतके मेसेज येतात की त्यांना रिप्लाय देताना एकाला पाठवायचा मेसेज दुसऱ्याच व्यक्तीला जातो. तुमच्यासोबतदेखील असं बऱ्याच वेळा झालं असेल. मात्र आता लवकरच हा गोंधळ मिटणार आहे. कारण व्हॉट्सॲपवर आता नवं फिचर आलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही प्रत्येक वैयक्तिक चॅटला किंवा ग्रुपलादेखील वॉलपेपर सेट करू शकता. या नवीन फीचरमुळे युजर्सना ते कुणाशी चॅट करत आहेत हे ओळखणं सोपं जाणार आहे.

फेसबुकच्या (facebook) मालकीचे चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन फीचर्स आणत असतं.  व्हॉट्सॲपने (whatsapp) नवीन फीचर्स  आणले असून यामध्ये कस्टम वॉलपेपर्स (custom wallpapers) लाईट आणि डार्क थीममध्ये सेपरेट वॉलपेपर्स (separate wallpapers) स्टिकर शोधण्यासाठी सर्च फिचर आणि नवीन ॲनिमेटेड पॅक यांचा समावेश आहे.  नवीन स्टिकर पार्कमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) 'Together at Home' या नवीन ॲनिमेटेड स्टिकरचादेखील समावेश आहे.

हे वाचा - Whatsapp वर आता शेड्युल करता येणार मेसेज, काय आहे नवीन फिचर जाणून घ्या

"तुमच्या व्हॉट्सॲप चॅट्सना तुमच्या आयुष्यात खास महत्त्व आहे म्हणूनच आम्ही चॅट वॉलपेपर सादर करत आहोत. तुमच्या चॅट्समधील सर्वात महत्त्वाच्या  आणि आवडत्या व्यक्तींसाठी कस्टम वॉलपेपर(custom wallpapers) वापरून तुम्ही वैयक्तिक आणि वेगळे चॅट वॉलपेपर ठेवा आणि चुकीच्या चॅटमध्ये चुकीचा मेसेज जाण्याच्या चिंतेतून मुक्त व्हा असं", असं व्हॉट्सॲपने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

याचबरोबर युझर्सला निवडण्यासाठी अधिक डुडल वॉलपेपर (doodle wallpapers) उपलब्ध आहेत आणि आता ते वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. स्टॉक वॉलपेपरमध्ये जगभरातील निसर्ग आणि आर्किटेक्चरच्या प्रतिमांसह अधिक पार्श्वभूमीदेखील आहेत. तर नवीन स्टिकर सर्च’(Sticker search) या फीचरमुळे स्टिकर लवकर शोधण्यास देखील मदत होणार आहे.

हे वाचा - WhatsApp वर काहीही डिलीट न करता असं लपवा पर्सनल चॅट

दरम्यान व्हॉट्सॲपनं नुकतंच अँड्रॉइड आणि आयओएस युझरसाठी disappearing messages हे नवीन फिचर आणलं आहे. यामध्ये सात दिवसांनंतर आलेले मेसेज आपोपाप डिलीट होणार आहेत. यामध्ये हे फिचर तुम्ही चालू किंवा बंद करून याचा वापर करू शकता. पर्सनल चॅटबरोबरच ग्रुप चॅटसाठी देखील तुम्ही या फीचर्सचा वापर करू शकता. कंपनी ग्राहकांच्या गरजांबद्दल सतत संशोधन करत असते आणि त्यांना हवी असलेले फीचर्स लगेच उपलब्ध करून देते त्यामुळे या ॲपची लोकप्रियता प्रचंड आहे. हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला आहे.

Published by: Priya Lad
First published: December 3, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या