Home /News /lifestyle /

कोरोना काळात काय खावं आणि काय नाही? WHO ने दिला आहाराबाबत सल्ला

कोरोना काळात काय खावं आणि काय नाही? WHO ने दिला आहाराबाबत सल्ला

काही लोकांना जेवल्यानंतर पुन्हा एकदा भूक लागण्याचीही सवय असते.

काही लोकांना जेवल्यानंतर पुन्हा एकदा भूक लागण्याचीही सवय असते.

कोरोना काळात लोकांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे.

मुंबई, 20 एप्रिल: देशभरात कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आणि आक्रमक आहे. अनेक आरोग्य विषयक संस्था नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. या सर्व स्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लोकांनी कोरोना काळात आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं, असा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी आपण कसा आणि कोणता आहार घेतला पाहिजे, याबाबत नुकतंच डब्ल्यूएचओनं मार्गदर्शन केलं आहे. महासाथीच्या (Pandemic) कालावधीत योग्य पोषक आहार (Healthy Diet) आणि हायड्रेशन (Hydration) फार महत्त्वाचं असल्याचं डब्ल्यूएचओने सांगितलं आहे. जे लोक संतुलित आहार घेतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते. त्यामुळे कोणतेही आजार आणि संसर्गापासून त्यांचे संरक्षण होऊ शकते. हे वाचा - सावधान! कोरोनापासून बचाव करताना तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण तर देत नाहीयेत ना? त्यामुळे लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन, खनिज, तंतुमय पदार्थ, प्रोटिन आणि अँटिऑक्सिडेंटचा समावेश केला पाहिजे. तसंच आपलं वजन वाढणार नाही, हृदयरोग किंवा मधुमेह होणार नाही याची काळजी घ्यावी. आहाराबाबत या गोष्टींची काळजी घ्या 1) रोज ताजं आणि प्रक्रिया न केलेलं अन्न सेवन करावं दररोज फऴं, हिरव्या पालेभाज्या, डाळी, बीन्स (Beans), धान्य, मांस (Meat), मासे, अंडी आणि दुधाचं सेवन करावं. दररोज 2 कप फळांचा रस, 2.5 कप भाजी, 108 ग्रॅम धान्य, 160 ग्रॅम मांस किंवा बीन्सचे सेवन करावं. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा रेडमिट (Red Meat) तर 2 किंवा 3 वेळा चिकन (Chicken) खावं. नाश्त्यात साखर, मीठ, फॅटयुक्त पदार्थांचं सेवन करू नये. त्याऐवजी फळं खावीत. हे वाचा - सर्वच कोरोना रुग्णांना Plasma therapy देणं गरजेचं आहे? भाज्यांमध्ये पोषक तत्वे कायम राहावी यासाठी त्या जास्त शिजवू नये. 2) भरपूर पाणी प्यावं दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल. याव्यतिरिक्त ताज्या फळांचे ज्युस, लेमन ज्युस प्यावं. कॅफिन, हार्ड आणि सॉफ्ट ड्रिंक्संचं सेवन टाळावं. 3) ठराविक प्रमाणातच चरबी युक्त पदार्थांचा वापर करावा सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅटसचा वापर करावा. रेड मीटऐवजी चिकन, व्हाईट मीट किंवा मासे यांचं सेवन करावे. प्रक्रियायुक्त मांसाचं सेवन टाळावं. कमी फॅटचं दूध वापरावं. फास्ट फूड (Fast Food), स्नॅक, फ्राईड फूड, फ्रोजन (Frozen), पिझ्झा, कुकीजचा वापर टाळावा. 4) मीठ आणि साखरेचा अधिक वापर टाळावा खाद्य पदार्थ तयार करतेवेळी मिठाचा वापर कमी प्रमाणात करावा. सॉसचा वापर टाळावा. रोज एक चमचा मिठाचं सेवन पुरेसं आहे. गोड कुकीजचे (Cookies) सेवन टाळा. कोल्ड ड्रिंक, पॅक्ड, ज्यूसचा वापर कटाक्षानं टाळावा. 5) बाहेरील पदार्थ खाणं टाळा दोन व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग पसरतो. त्यामुळे बाहेर जाऊन पदार्थ खाणं टाळावं. बाहेरील अस्वच्छ अन्नपदार्थांचे सेवन टाळा. शक्य असेल तितके घरच्या पदार्थांचं सेवन करा. 6) मानसिक आरोग्य सांभाळा जे लोक किंवा ज्यांचं कुटुंबं कोरोनाशी लढतं आहे त्यांना पोषक आहाराबरोबरच मानसिक आधाराची (Mental Support) गरज आहे. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहिल याची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Food, Health, Lifestyle, Wellness, Who

पुढील बातम्या