मुंबई 31 जानेवारी : वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट जागा सांगितली आहे. त्या बाजूला किंवा दिशेला जर ती वस्तू असेल, तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. भारत देशापासून ते जगात इतर ठिकाणी देखील वास्तूशास्त्रला महत्व दिलं जातं. मोठमोठे आर्किटेक्ट आणि सेलिब्रिटी देखील वास्तुशास्त्र मानतात.
वास्तुशास्त्रात आपल्या पर्सबद्दल देखील काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ज्याला फॉलो केल्यामुळे लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल. शिवाय यात अशा गोष्टींबद्दल देखील सांगितल्या गेल्या आहेत, ज्या लोकांनी कधीही आपल्या पाकिटात ठेवू नयेत. चला पाहूयात ती अशा कोणत्या गोष्टी आहेत.
सामान्यत: पैशांव्यतिरिक्त आपण आपल्या पर्समध्ये इतरही अनेक गोष्टी ठेवतो, यातील अनेक गोष्टी अशाही असतात की त्यांचा पर्समध्ये काहीही उपयोग नसतो, तरीही आपण त्यांना ठेवतो, पण वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये निरुपयोगी वस्तू ठेवणे टाळले पाहिजे. पर्समधून काही उपयोग नसलेल्या वस्तू फेकून देणं योग्य आहे.
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की पर्समध्ये काही वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, तसेच धनहानी होते. दुसरीकडे, वास्तुनुसार, अशा काही गोष्टी आहेत ज्यांना आपल्या पाकिटात स्थान दिल्यास, आपल्याला शुभ परिणाम प्राप्त होतात आणि प्रगती देखील होते.
वास्तुशास्त्रानुसार कापलेल्या किंवा फाटलेल्या नोटा पर्समध्ये ठेवू नयेत.
पर्समध्ये खराब कागद ठेवू नये, त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो असे मानले जाते.
पर्स घाण करू नका, स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे.
मग आता कोणत्या गोष्टी पर्समध्ये ठेवल्या पाहिजेत. हे देखील माहित करुन घ्या
पर्समध्ये लक्ष्मीचे चित्र ठेवणे शुभ मानले जाते. पण हा फोटो वेळोवेळी बदलायला हवा.
तुम्ही पर्समध्ये श्री यंत्र देखील ठेवू शकता, हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Social media, Social media trends, Vastu, Viral