नवी दिल्ली, 23 एप्रिल : आपल्या जीभेला चविष्ट पदार्थ आवडत असतात. हे पदार्थ बनवण्यासाठी तेल मसाल्यांव्यतिरिक्त विविध गोष्टींचा वापर केला जातो. असे खाद्य पदार्थ जिभेला तृप्त करतात, पण आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलेच हानीकारक ठरतात. जास्त तेल, मसाले आणि जास्त अन्न तळण्याच्या प्रक्रियेत त्यातील पदार्थांमधील (What precautions should be taken to prevent weight gain) पोषक तत्वे संपतात.
याशिवाय अलिकडे लोकांना जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड इत्यादी खाणे आवडते. लोकांना या गोष्टी खाण्याची सवय कधी लागते, ते कळतही नाही. पण, या गोष्टी शरीरात झपाट्याने चरबी जमा करतात आणि लठ्ठपणा वाढवण्याचे कारण बनतात. तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल आणि तुमचे वजन संतुलित ठेवायचे असेल तर तुमच्या फूड लिस्टमधून या 5 गोष्टी काढून टाकायला (prevent weight gain) हव्यात.
तळलेले पदार्थ
ऋतू बदलला की जिभेला काही चटपटीत हवं असतं. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात अनेकजण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तळलेल्या आणि मसालेदार पदार्थांवर ताव मारतात. अनेकजण चाट पकोडे, टिक्की, छोले भटुरे आणि समोसे इत्यादींचा आस्वाद घेतात. पण, प्रत्यक्षात या गोष्टी आपला लठ्ठपणा झपाट्याने वाढवतात. हे पदार्थ जास्त खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
बटाटा
बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. बटाटे खायलाही खूप चविष्ट असतात. त्यामुळं लोकांना ते खूप आवडतात. बटाटा कोणत्याही भाजीत घालून शिजवून खाता येतो. बटाट्याच्या मदतीने अनेक चविष्ट पदार्थ देखील तयार केले जातात. पण ज्यांना आपलं वाढलेलं वजन आटोक्यात आणायचं असेल, त्यांनी बटाटे कमी प्रमाणात खावेत. बटाट्यामुळं वजन झपाट्यानं वाढतं.
हे वाचा - यासाठी उन्हाळ्यात रात्रीसुद्धा अंघोळ करा; कित्येक प्रॉब्लेम्स होण्यापूर्वीच टाळा
पांढरे पदार्थ
तुमचं वजन वाढवण्यात पांढरा ब्रेड, भात, साखर यांचा मोठा वाटा आहे. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर ब्राउन ब्रेड, पांढर्याऐवजी ब्राऊन राइस आणि साखरेऐवजी गूळ खा.
प्रक्रिया केलेलं अन्न आणि जंक फूड
हल्ली लोकांकडे वेळेची कमतरता आहे. अशा परिस्थितीत लोकांना प्रक्रिया केलेलं अन्न अतिशय सोयीचं वाटतं. पण यामुळं वजन वाढण्यासोबतच आरोग्यालाही हानी पोहोचते. शिवाय जंक फूड, फास्ट फूड जास्त खाल्ल्यानं तुम्हाला त्याचं व्यसन लागू शकतं. हे पदार्थ तुम्हाला बेडौल बनवतात.
हे वाचा - दीर्घायुष्य तुमची हाडे दणकट, मजबूत राहतील; आजपासूनच या चुकीच्या सवयी सोडा
दारू
दारूचं व्यसन ही देखील एक वाईट गोष्ट आहे. जर तुम्ही रोज दारू प्यायली तर तुमच्या हार्मोन्सची पातळी बिघडते. त्यामुळं शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. तसंच वजनही झपाट्यानं वाढतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight loss tips