जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Sugar control: शुगर नियंत्रणात ठेवणं कोणालाही होईल सोपं; या घरगुती उपायांचा परिणाम आहे भारी

Sugar control: शुगर नियंत्रणात ठेवणं कोणालाही होईल सोपं; या घरगुती उपायांचा परिणाम आहे भारी

Sugar control: शुगर नियंत्रणात ठेवणं कोणालाही होईल सोपं; या घरगुती उपायांचा परिणाम आहे भारी

मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी जाणून घेऊया. हे घरगुती उपाय नियमित किंवा योग्य पद्धतीने केल्या शुगर नियंत्रणात ठेवणं अवघड नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै : मधुमेहाच्या उपचारात औषधांइतकाच आहार महत्त्वाचा आहे. आपण जे काही खातो-पितो त्याचा मधुमेहावर खूप परिणाम होतो. प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिजे आणि जीवनसत्त्वे समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर मधुमेही रुग्णांना देतात. रुग्णाचा आहार प्लॅन, रुग्णाचे वय, मधुमेह स्थिती, वजन यासह अनेक गोष्टींवर या आजाराची स्थिती अवलंबून (Sugar control Tips) असते. काही गोष्टी रुग्णाच्या आहार योजनेवर परिणाम करतात. मधुमेही रुग्णांना कडधान्ये मुबलक प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी जाणून घेऊया. मेडटॉक मध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शुगर कमी करण्याचे उपाय :- 1. 6 बेलाची पाने, 6 कडुलिंबाची पाने, 6 तुळशीची पाने, 6 वांग्याची हिरवी पाने, 3 अख्खी काळी मिरी बारीक करून रिकाम्या पोटी पाण्यात घालून सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. लक्षात ठेवा, ते प्यायल्यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका. 2. आवळा :- 10 मिलीग्राम आवळ्याच्या रसात 2 ग्रॅम हळद मिसळून ते सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. हा उपाय दिवसातून दोनदा करा. 3. तुळशी:- तुळशीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटीबायोटिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीएजिंग, अँटीफंगल गुणधर्म आढळतात. ज्यापासून इजेनॉल, मिथाइल इजिनॉल आणि कॅरिओफिलीन तयार होतात. हे सर्व घटक एकत्रितपणे इन्सुलिन साठवून सोडणाऱ्या पेशींना योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करतात. याशिवाय त्यात असे अनेक घटक आढळतात जे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना इन्सुलिनच्या दिशेने सक्रिय करतात. या पेशी इन्सुलिनचा स्राव वाढवतात. सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन तुळशीची पाने चावून खावीत किंवा वाटल्यास तुळशीचा रसही पिऊ शकता. यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात येईल. तुळशीच्या सेवनासोबतच जर तुम्ही साखर कमी करणारी औषधे घेत असाल तर काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. . 4. अमलतासची काही पाने धुवून त्यांचा रस काढा. याचा एक चतुर्थांश कप रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने साखरेच्या उपचारात फायदा होतो. 5. ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते. हे एक सक्रिय अँटी-ऑक्सिडंट आहे. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरेल. 6. जेवणानंतर बडीशेपचे नियमित सेवन करा. बडीशेप खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. या घरगुती उपायांचा अवलंब करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या. 7. जांभूळ :- जांभळाच्या मोसमात काळे मीठ टाकून जांभूळ खाल्ल्याने मधुमेहाचा आजार कमी होतो. याशिवाय त्याच्या बिया वाळवून पावडर बनवा आणि 2-2 चमचे कोमट पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मधुमेहाच्या आजारात खूप फायदा होतो. 8. शेवग्याच्या शेंगा :- शेवग्या शेंगा खास करून दक्षिण भारतातील जेवणात जास्त असतात. तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो. शेवग्याच्या शेंगा आणि पानांच्या रसाचे सेवन देखील मधुमेहाची समस्या कमी करण्यास उपयुक्त आहे. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर 9. सलाद किंवा भाजी म्हणून बीट खा. साखरेच्या उपचारादरम्यान बीट खाणे खूप फायदेशीर आहे. 10. रोज सकाळी रिकाम्या पोटी अंबाडीचे चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्याने मधुमेह कमी होतो. फ्लॅक्ससीडमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते चरबी आणि साखर योग्यरित्या शोषण्यास मदत करते. फ्लॅक्ससीड्स मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जेवणानंतरची साखर सुमारे 28 टक्क्यांनी कमी करतात. 11. कारल्याचा रस:- रोज सकाळी कारल्याचा रस किंवा कारल्याच्या भाजीचे सेवन केल्याने मधुमेहाचा आजार आटोक्यात येतो. 12. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात मेथीचे दाणे टाका. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि मेथी दाणे चावून खा. याचे नियमित सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा 13. कोरफड:- कोरफडीचा रस आवळ्याच्या रसात मिसळून सकाळी घेतल्यास मधुमेहातही चांगला फायदा होतो. 14. रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी महिनाभर रोजच्या आहारात एक ग्रॅम दालचिनीचा वापर करा. साखरेसाठी घरगुती औषध म्हणून तुम्ही दालचिनी वापरू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात