मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दारूच्या नशेत गाडी चालवताना एखाद्याचा जीव गेल्यास पडेल महागात; इतके वर्ष भोगावी लागेल जेलची हवा

दारूच्या नशेत गाडी चालवताना एखाद्याचा जीव गेल्यास पडेल महागात; इतके वर्ष भोगावी लागेल जेलची हवा

drunk driving

drunk driving

भारतात फक्त दारू पिऊन अपघात झाला तरच शिक्षेची तरतूद नाही. तर, दारू पिऊन गाडी चालवणे हादेखील गुन्हा मानला जातो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई,27 मार्च :  काही लोक मद्यपान करून वाहन चालवतात, अशावेळी त्यांचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि अपघात होतो. या अपघातात एखाद्या माणसाचा नाहक बळी जातो. पण, अशा घटनेत चालकावर कोणती कारवाई होते किंवा याबद्दल शिक्षेची तरतूद काय आहे, तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीतर तर जाणून घ्या. एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरून वाहन चालवत असेल आणि त्याच्याकडून एखादा अपघात झाला आणि त्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या माणसाला तुरुंगात जावं लागू शकतं. एखादी व्यक्ती दारूच्या नशेत बेजबाबदारपणे गाडी चालवत असेल आणि त्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास आरोपीवर 304 A, 279, मोटार वाहन अधिनियम 185 अंतर्गत कारवाई होऊ शकते.

    मोटार वाहन (सुधारणा) विधेयक, 2016 नुसार, मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दलचा दंड दोन हजार रुपयांवरून 10 हजार रुपये करण्यात आला. पूर्वी आरोपीला दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही, अशी तरतूद होती. पण सरकारने या प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद केली. त्यानुसार 7 वर्षांसाठी तुरुंगवास आणि 10 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात अपघाती मृत्यू होण्याची संख्या मोठी आहे. आधी शिक्षा व दंडाची तरतूद कमी काळासाठी होती, त्यामुळे अपघातांचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे यावर उपाय म्हणून सरकारने शिक्षेच्या तरतुदीत बदल केले होते.

    हेही वाचा - चहासोबत धूम्रपान केल्यास गंभीर आजाराचा वाढतो धोका

    भारतात फक्त दारू पिऊन अपघात झाला तरच शिक्षेची तरतूद नाही. तर, दारू पिऊन गाडी चालवणे हादेखील गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये दंड, सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. हाच गुन्हा पुढील तीन वर्षांत केल्यास, त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी तीन हजार रुपये दंड, दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 नुसार ही कारवाई केली जाते.

    100ml रक्तामध्ये 30mg दारू असेल तर ती व्यक्ती नशेत आहे, असं मानलं जातं. त्यामुळे ती व्यक्ती वाहनावर कंट्रोल ठेवण्यास अक्षम आहे असं समजून त्याच्यावर ड्रंक अँड ड्राइव्हसंबंधी कायद्याअंतर्गत कारवाई होते. अशातच नशेत असताना अपघात झाल्यास त्यानुसारही कारवाई केली जाते. भारतात दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. त्यामुळे अशा गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी लोकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

    First published:
    top videos

      Tags: Accident, Drive, Law