मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चहासोबत धूम्रपान केल्यास गंभीर आजाराचा वाढतो धोका

चहासोबत धूम्रपान केल्यास गंभीर आजाराचा वाढतो धोका

चहासोबत सिगारेट ओढायची सवय आहे घातक

चहासोबत सिगारेट ओढायची सवय आहे घातक

चहासोबत सिगारेट ओढायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा यामुळे कॅन्सर होऊ शकतो. एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 27 मार्च :   धूम्रपान असो अथवा मद्यपान, कोणतंही व्यसन आरोग्यासाठी घातक असतं. काही जणांना चहा, कॉफीसारख्या पेयांची विशेष आवड असते. मूड फ्रेश करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, रात्रीच्या वेळी जागता यावं यासाठी अनेक जण कॉफी किंवा चहा पितात; पण ही गोष्टदेखील आरोग्यासाठी घातक असते. काही जणांना चहासोबत धूम्रपान करण्याची सवय असते. मित्रांसोबत गप्पा मारताना, ऑफिसमध्ये लंच ब्रेकदरम्यान किंवा मूड व्यवस्थित करण्यासाठी काही जण चहासोबत सिगारेट ओढतात; पण या सवयीचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. चहासोबत सिगारेट ओढायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा यामुळे कॅन्सर होऊ शकतो. एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

  काही गोष्टी जीवनशैलीचा अविभाज्य घटक असतात. चहासोबत धूम्रपान करणं ही सवय काही जणांना असते. धूम्रपान आरोग्यासाठी घातक असतं. त्यात चहासोबत सिगारेट ओढण्याची सवय अधिकच धोकादायक ठरू शकते. लंच किंवा टी ब्रेकदरम्यान चहासोबत सिगारेट ओढत असाल तर ही सवय तातडीने सोडण्याची गरज आहे.

  Swimming : थंड पाण्यात पोहणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? पाहा काय आहे संशोधकांचे मत

  दूधमिश्रित चहासोबत धूम्रपान करणं धोकादायक मानलं जातं; पण ग्रीन टीसोबत धूम्रपान केल्यास कोणाताही धोका उद्भवत नाही, असं दुसऱ्या एका संशोधनात दिसून आलं आहे. ग्रीन टीमध्ये आढळणारं एल-थेनिन नावाचं अमिनो आम्ल चिंता कमी करण्यास मदत करतं. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणं आणि एकाग्रता वाढवण्यास एल-थेनिन मदत करतं. ग्रीन टीमुळे शरीरातली पचनशक्ती वाढते. फॅट्स कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

  सकाळी किंवा संध्याकाळी टी ब्रेकमध्ये चहासोबत गप्पा मारत मूड फ्रेश करणं सर्वांनाच आवडतं; पण चहा घेण्याचेही काही नियम आहेत. काही जणांना चहासोबत धूम्रपानाची सवय असते. जीवनशैलीतल्या या सवयीमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. अशी सवय धोक्याची घंटा असल्याचं एका संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे चहासोबत सिगारेट ओढण्याची सवय तात्काळ सोडणं गरजेचं आहे. संशोधकांच्या मते, चहासोबत सिगारेट ओढल्याने कॅन्सरची शक्यता 30 टक्क्यांनी वाढते. चहामध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. हे घटक शरीरासाठी धोकादायक मानले जातात. हे विषारी घटक जेव्हा सिगारेटसोबत एकत्र होतात, तेव्हा कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होतात. त्यामुळे चहासोबत सिगारेट ओढणं टाळावं, असं संशोधकांनी सांगितलं.

  First published:
  top videos

   Tags: Cancer, Lifestyle, Smoking