मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Pitru Paksha: पितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत? काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा?

Pitru Paksha: पितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत? काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा?

गणेशोत्सव संपला आणि नवरात्र घटस्थापना होईपर्यंत 15 दिवस पितृपक्ष असतो. काय आहे या श्राद्धकाळाचं महत्त्व? या काळात शुभकार्य का केली जात नाहीत?

गणेशोत्सव संपला आणि नवरात्र घटस्थापना होईपर्यंत 15 दिवस पितृपक्ष असतो. काय आहे या श्राद्धकाळाचं महत्त्व? या काळात शुभकार्य का केली जात नाहीत?

गणेशोत्सव संपला आणि नवरात्र घटस्थापना होईपर्यंत 15 दिवस पितृपक्ष असतो. काय आहे या श्राद्धकाळाचं महत्त्व? या काळात शुभकार्य का केली जात नाहीत?

  नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: भारतीय संस्कृतीत (India Culture marathi calender) विविध परंपरा, सण-उत्सव, चाली-रीतींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. मराठी कालगणनेनुसार, अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर पौर्णिमा संपली की पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा (Pitru Paksha) सुरू होतो. याला श्राद्ध-पक्षदेखील (Shradh Paksha) म्हणतात. या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याची परंपरा आहे. यंदा आज, 20 सप्टेंबरपासून पितृपंधरवड्याला सुरुवात झाली आहे. या कालावधीत जावळ, साखरपुडा, विवाह आणि गृह खरेदी, गृह प्रवेश निषिद्ध मानला गेला आहे. याशिवाय विवाह जुळवण्याविषयीची बोलणीदेखील या कालावधीत केली जात नाहीत. यामागे अनेक कारणं आहेत. याविषयीची सविस्तर माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

  भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेनंतर पितृपंधरवड्याला प्रारंभ होतो. आज, 20 सप्टेंबरपासून या वेळचा पितृपंधरवडा सुरू झाला आहे. भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येपर्यंत हा पितृपंधरवडा असतो. यंदा 6 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. या कालावधीत कोणतीही शुभ कार्यं (Auspicious Events) केली जात नाहीत.

  साप्ताहिक राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींची नोकरी, व्यवसायात होणार प्रगती

  आपले पितर हे आपल्यासाठी आदरणीय आणि पूजनीय असतात. पितृ-पक्षादरम्यान ते आपल्याकडे येतात असा समज आहे. त्यामुळे पितृ पंधरवडा हा त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी, तसंच आत्मिक रूपानं त्यांच्याशी जोडणारा असतो. त्यामुळे हा कालावधी शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानला जातो. पितरांचं पूजन आणि स्मरण केल्यानं आपल्या वंशजांना वाटणारी आपुलकी पाहून ते समाधान व्यक्त करतात, असाही समज असल्याचं ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्रा यांनी सांगितलं.

  पितर पूजनानिमित्त केल्या जाणाऱ्या श्राद्धावेळी पंडित किंवा तत्सम व्यक्तीला जेवण दिलं जातं. हे भोजन थेट पितरांपर्यंत पोहोचतं असं मानलं जातं. त्यामुळं या व्यक्तींना सन्मानपूर्वक आणि श्रद्धेनं जेवायला बोलावलं जातं.

  श्राद्धासाठी दुपारी 12 ते 12.30 ही वेळ श्रेयस्कर समजली जाते. त्यामुळे या काळात भोजन देणं आवश्यक आहे.

  श्राद्धावेळी जेव्हा ब्राह्मणभोजन केलं जातं, तेव्हा अन्नपदार्थ (Food In shradh paksha) दोन्ही हातांनी वाढावेत आणि या कालावधीत फार बोलू नये. तसंच श्राद्धाच्या दिवशी जेवण तयार करताना शुद्धतेची पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. अन्नपदार्थांमध्ये कांदा, लसूण यांचा वापर करू नये. ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात, त्यांचा वापर या जेवणासाठी करू नये, असं सांगितलं जातं.

  आहारात Vitamin D च्या समावेशामुळे कमी होत आहे कोरोनाचा धोका?

  जेवणानंतर ब्राह्मणाला यथोचित दक्षिणा आणि वस्त्रं दान करावीत, त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा, असं डॉ. मिश्रा यांनी सांगितलं.

  या पंधरवड्यात पितृलोकात पाण्याची कमतरता असते. त्यामुळे आपले पूर्वज पृथ्वीवरच्या आपल्या आप्तस्वकीयांकडे येतात. जेव्हा वंशज तर्पण करतात, तेव्हा पितर तृप्त होतात आणि त्यांना शांती लाभते. यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते, असं डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केलं.

  पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपंधरवड्यात त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करून, पूजाविधी केल्यास निश्चितच कुटुंबाला सुख-शांती लाभू शकते.

  First published:
  top videos

   Tags: Culture and tradition, Pitru paksha