• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • साप्ताहिक राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींची नोकरी, व्यवसायात होणार प्रगती

साप्ताहिक राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींची नोकरी, व्यवसायात होणार प्रगती

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

Weekly Horoscope : नोकरदार, व्यावसायिकांसाठी उत्तम आहे का आठवडा.

  • Share this:
आज दिनांक 19 सप्टेंबर 2021. आज रविवार, तिथी अनंत चतुर्दशी. पार्थिव गणपती विसर्जन आज केल्या जाईल. चंद्र कुंभ राशीत भ्रमण करेल. मंगळ, बुध, रवी कन्या राशीत तर शुक्र तुला राशीत भ्रमण करीत असून गुरू शनि मकर राशीत आहेत. वृश्चिक राशीत केतू आणि वृषभ राशीत राहू स्थित आहेत. या ग्रह स्थिती अनुसार पाहुया या आठवड्याचे राशी भविष्य. (लग्नानुसार ) मेष दशम स्थानात प्रवेश केलेला गुरू काही महत्त्वाची राहिलेली कामं उरकून टाकेल. प्रमोशन किंवा  ग्रेड वाढीची संभावना आहे. शनी सातत्याने तुम्हाला मदत करतो आहे. षष्ठ स्थानात आलेले ग्रह तुमच्यासाठी शत्रू निर्माण करतील. पण विजय तुमचाच होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी जपून राहावं. उच्चीचा शुक्र जोडीदारासाठी शुभ फळ देईल. पौर्णिमा खर्चाची. सप्ताह अनुकूल आहे. वृषभ राशीच्या पंचमात मंगळ, रवी अणि बुध संततीला प्राधान्य द्या असं सुचवत आहेत. उच्च शिक्षण, आध्यात्मिक प्रगती यासाठी शुभ काळ. भाग्यात आलेला गुरू लांबचे प्रवास योग आणेल. आर्थिक स्थिती बरी. पैतृक संपत्ती मिळेल. षष्ठ स्थानात शुक्र नोकरीमध्ये उत्तम प्रगती होईल. राशीतील राहू  थोडी द्विधा मनस्थिती करेल. पौर्णिमा लाभदायक ठरेल. उत्तरार्ध अनुकूल. मिथुन अष्टमात आलेले शनि गुरू मन पुन्हा अस्थिर करतील. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवास सांभाळून करा. चतुर्थात मंगळासारखाच ग्रह अशांतता निर्माण करेल. करार, घरासंबंधी बोलणी यशस्वी होतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. शुक्र संततीसाठी शुभ फळ देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे. जपून रहा. पौर्णिमा मिश्र फळ देईल. कर्क राशीच्या समोर आलेले गुरू शनि वैचारिक बैठक मजबूत करतील. थोडी नकारात्मक मानसिकता होईल. त्यावर ताबा असू द्या. चतुर्थ स्थानात आलेला शुक्र घरासाठी सुंदर वस्तूंची खरेदी  करेल. भावंडं भेट, प्रवास संभवतात. पराक्रम आणि चिकाटी वाढेल. पौर्णिमा भाग्याची. सप्ताहात सुरवातीला प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. गुरु उपासना सुरू ठेवावी. सिंह धन कुटुंब वाणी स्थान सध्या जागृत आहे. कुटुंबात काही घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल पण कटू शब्द, वादविवाद टाळा. कला प्रकारात रुची वाढेल. सौंदर्य प्रसाधन, कपडे खरेदी होईल. गुरू शनि हळूहळू मार्गी अवस्थेत येत आहेत. शत्रूवर मात करू शकाल. नोकरी पेशा व्यक्तींना शुभ काळ. पौर्णिमा जपून राहण्याची आहे. सप्ताह चांगला जाईल . कन्या राशीत आलेले मंगळ रवि बुध तुमच्यात एक अधिकाराची भावना निर्माण करतील पण एक विचित्र अशी काळजी लागून राहिल. त्याला महत्त्व देऊ नका. रागावर ताबा ठेवा. उष्णता वाढेल. आर्थिक लाभ संभवतात. दागदागिने खरेदी कराल. उच्च शिक्षणासाठी अनुकूल वेळ. ग्रहस्थितीचा फायदा करून घ्या. सप्ताहाची सुरुवात अनुकूल होईल. पौर्णिमा जोडीदाराला शुभ फळ देणारी. तुला राशीतील शुक्र अतिशय शुभ आहे तरीही व्यय स्थानातील ग्रहांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्थिक बाजू सांभाळा. मोठे खर्च, प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. संतती सुख चांगलं. मातृ पितृ चिंता सतावू शकते. पण गुरुकृपा आहे. काळजी नको. हळूहळू परिस्थिती सुधारेल. उत्तरार्ध अनुकूल. पौर्णिमा चिंतेची, काळजी घ्या. वृश्चिक पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर संततीकडे लक्ष असू द्या. तृतीय गुरू शनि मोठ्या प्रवासाचे योग आणतील. पराक्रम वाढेल. बहीण भाऊ भेटतील. व्यय स्थानात शुक्र चैनीची आवड निर्माण करेल. मौजमजेसाठी खर्च कराल. आनंद मिळेल. मित्रांमध्ये वेळ, पैसा घालवाल. प्रकृती जपा. सप्ताहात अनेक चांगले क्षण येतील. धनु सध्या तुमचं कार्यक्षेत्र तुमची प्राथमिकता राहिल. त्यापासून काही लाभ होतील. मित्रमैत्रिणी मदत करतील. आईचे स्वास्थ्य जपा. आर्थिक लाभ संभवतात. परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं. लाभदायक फळे देणारा सप्ताह आहे. घरासाठी विशेष खरेदी कराल. पौर्णिमा गृहसौख्य देणारी ठरेल. मकर राशीत आलेला गुरू एक नव चैतन्य आणणार आहे. नकारात्मक विचार कमी होतील. संतती चिंता कमी होईल. ईश्वरी उपासना सुरू ठेवावी. भाग्य स्थानात रवी उच्च अध्यात्मिक अनुभव देणारा ठरेल. वडीलधारी व्यक्ती तुम्हाला सहाय्यक ठरेल. प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने सर्व प्रश्न सोडवाल. मन आनंदी ठेवा. सप्ताहात पौर्णिमा परस्पर संवाद वाढवेल. कुंभ व्यय स्थानात गुरू शनि परदेश प्रवाससंबंधी काही निर्णय होतील. खर्च वाढेल. दवाखान्यात जाण्याची वेळ येईल. कायदा पाळा. सरकारी नोकरी असणार्‍यांना काळजी घ्यावी  लागेल. घरांमध्ये काही बदल कराल. वास्तुसंबंधी निर्णय होईल. पौर्णिमेच्या आसपास मोठा आर्थिक लाभ होईल. धन आगमन योग आहे. संतती चिंता राहिल. प्रवासात काळजी घ्यावी. मीन गुरू महाराज प्रसन्न आहेत. अनेक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील  पराक्रम आणि चिकाटी वाढेल. व्यवसाय उत्तम राहिल. भागीदारीमध्ये सामंजस्य असू द्या. नवीन निर्णय मिळून घ्या. जोडीदाराला समजून घ्या. त्यांना वेळ द्या. वाद नको. संतती सुख चांगलं राहिल. पौर्णिमा स्वराशीत उन्नतीची ठरेल. उच्च बुध अणि शुक्र व्यवसायातून उत्तम लाभ देतील. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published: