मुंबई, 14 मार्च : आई-वडील होणं हा एक आनंददायी अनुभव असतो. परंतु, त्यासोबत अनेक जबाबदाऱ्याही (Responsibilities) येतात. मुलाची योग्य काळजी घेणं, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं, मुले मोठी होत असताना त्याला येणाऱ्या समस्या समजून घेणं. तो रोज काहीतरी नवीन शिकतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. मुलांना बोलता येत नाही, तोपर्यंत त्यांना होणारे त्रास (Baby Problems) समजून घेणं ही सर्वात मोठी कसरत असते. यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे हातवारेही करतात. या काही हावभावांपैकी एक म्हणजे बाळ स्वत:चे कान (Ear) वारंवार ओढणं किंवा कानाला सारखा स्पर्श करणं. खरंतर ही एक सामान्य समस्या आहे, जी कोणत्याही मुलाला होऊ (Child Care tips) शकते. मात्र, याविषयी काळजी घेतली नाही तर ही समस्या वाढू देखील शकते. जाणून घेऊया की मूल कानाला वारंवार का स्पर्श करतं. - पुरळ जर तुमचे मूलही हाताने वारंवार कानाला स्पर्श करत असेल किंवा कान पकडून खेचत असेल, तर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्या कानाच्या आजूबाजूच्या भागात पुरळ तर उठलेले नाहीत ना, हे पाहावे. काही मुलांची त्वचा कोरडी असते आणि कोरड्या त्वचेमुळे त्यांना पुरळ उठण्याची समस्या होते. हे वाचा - हे व्यायाम प्रकार केल्यानं वाढू शकतं आयुष्य! इतका वेळ केल्यानंतर दिसतो परिणाम - कानाचा संसर्ग तुमच्या मुलाचे वारंवार कान खेचणे आणि धरून ठेवण्यामागे संसर्गाची समस्या देखील असू शकते. जर मुलाला कानात संसर्ग झाला असेल तर तो वारंवार कान धरून खेचतो. त्यामुळे मुले अस्वस्थ होतात आणि रडतात. त्यामुळे जर तुमच्या मुलानेही असे केले तर त्याला ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. हे वाचा - बाळाचे आहेत सपाट पाय?वाढत्या वयानुसार बरे होतील म्हणून दूर्लक्ष करणं पडेल महागात - जेव्हा घाम येतो काही मुलांची त्वचा तेलकट असते तर काही मुलांना जास्त घाम येतो. घामामुळे मुलांचे कान खाजायला लागतात. त्यामुळे मुले कान पकडून ओढू लागतात. तुमच्या मुलांना सुती कपडे घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना जास्त घाम आला तर ते लवकर सुकतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.